OnePlus आणि Redmi स्मार्टफोन्स Amazon India वेबसाईटवर बेस्ट सेलर आहेत. तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि Redmi 9A Sport खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. Redmi च्या फोनवर 7 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळेल. तर OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह 13 हजार रूपयांपेक्षा जास्त बचत करण्याची संधी आहे. चला तर जाणून घेऊयात या दोन्ही स्मार्टफोनवरील ऑफर्स…
हे सुद्धा वाचा : IMDb कडून 2022 मधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आणि वेब सीरिजची यादी जाहीर, बघा यादीत टॉपवर कोण ?
OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत 19,999 रुपये आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास फोनवर 2000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे. त्याबरोबरच, 3,333 रुपयांच्या नो-कॉस्ट EMI वर फोन घेण्याची संधी देखील आहे. फोनवर 11,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. येथून खरेदी करा…
OnePlus स्मार्टफोनमध्ये 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.59 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. स्क्रीनची पिक्सेल डेनसिटी 402 ppi आहे. यात Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये Android 12 आधारित Oxygen OS देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33 W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी आणि 2 मेगापिक्सल डेप्थ, 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. हँडसेटमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Redmi 9A Sport मध्ये 6.53 इंच HD+ डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल प्रायमरी रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 2 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi 9A Sport ची किंमत Amazon वर 6,999 रुपयांना लिस्ट करण्यात आली आहे. याबरोबरच, ग्राहकांना यामध्ये 600 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील मिळण्याची शक्यता आहे. फोन 1,167 रूपयांच्या नो-कॉस्ट EMI वर मिळू शकतो. HSBC कॅशबॅक कार्डद्वारे फोनवर 250 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. या फोनवर 6,600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.