oneplus nord 4 5g
फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या OnePlus ने मागील वर्षी भारतात OnePlus Nord 4 5G फोन सादर केला होता. जर तुम्हाला देखील कमी किमतीत उत्तम OnePlus 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. सध्या ब्रँड OnePlus Nord 4 5G स्मार्टफोनच्या किमतीवर 4,000 रुपयांची सूट ऑफर करत आहे. यासोबतच, बँक डिस्काउंटनंतर फोनवर हजारो रुपयांची सूट मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus Nord 4 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: iQOO Neo 10R ची पहिली सेल आज! ‘या’ टॉप फीचर्ससह येतो लेटेस्ट स्मार्टफोन, पण…
OnePlus Nord 4 5G फोन Amazon वर मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. सुरुवातीला या फोनची किंमत 32,999 रुपये इतकी होती. परंतु, आता ती 4000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, त्यानंतर हा फोन 28,998 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 4000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
याव्यतिरिक्त, ब्रँड नो-कॉस्ट EMI पर्याय देखील देत आहे. ज्याचा वापर करून डिव्हाइस 3 ते 6 महिन्यांच्या सोप्या हप्त्यांमध्ये खरेदी करता येते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
OnePlus Nord 4 5G मध्ये 6.74-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा डिस्प्ले 2772 × 1240 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो.
OnePlus Nord 4 फोन उत्तम परफॉर्मन्ससाठी, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon 7 Plus Gen 3 चिपसेटने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज मिळेल.
OnePlus Nord 4 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP Sony LYTIA प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जो OIS सह येतो. यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
पॉवर बॅकअपसाठी, OnePlus Nord 4 5G मध्ये मोठी 5500mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
OnePlus Nord 4 5G स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4, NFC, USB टाइप-C पोर्ट, फिंगरप्रिंट सेन्सर अशा अनेक फीचर्स मिळतात.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.