oneplus nord 4 5g
फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus ने अलिडकेच OnePlus Nord 4 5G फोन लाँच केला होता. सध्या हा फोन मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर तुम्हाला देखील हा फोन खरेदी करायचा असेल तर, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईटवर हा फोन ऑफर्ससह मिळत आहे. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. जाणून घेऊयात OnePlus Nord 4 5G ची किंमत, ऑफर्स आणि फीचर्स-
Also Read: Vivo ने भारतात गुपचूप लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त ऑफर्स
OnePlus Nord 4 5G ची किंमत Amazon वर 31,998 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा फोन या किमतीत 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने OnePlus Nord 4 खरेदी केल्यास 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. स्मार्टफोनवर 1406 रुपयांचा EMI दिला जात आहे. हँडसेटवर 22,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. Buy From Here
OnePlus Nord 4 5G स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेमध्ये प्रो XDR आणि अॅक्वा टचचा सपोर्ट देण्यात आला आहे.
उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या OnePlus Nord 4 मध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Plus Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या हँडसेटमध्ये Adreno 732 GPU उपलब्ध आहे.
उत्तम फोटोग्राफीसाठी, OnePlus Nord 4 5G मध्ये 50MP चा प्राथमिक सेन्सर आहे. यासह, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनच्या पुढील बाजूला आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल.
OnePlus Nord 4 फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, या फोनमध्ये 100W SuperVOOV फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील उपलब्ध आहे. तर, इतर फीचर्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.