आकर्षक लुकसह येणाऱ्या OnePlus Nord 3 वर मिळतोय थेट 13,000 रुपयांचा Discount, बघा ऑफर। Tech News
OnePlus Nord 3 स्मार्टफोनवर Amazon वर मोठी सवलत देण्यात येत आहे.
OnePlus ने फोनवर तब्बल 13,000 रुपयांची थेट सूट ऑफर केली आहे.
OnePlus Nord 3 फोनमध्ये 50MP वाइड लेन्स (Sony IMX890/OIS) सह आहे.
Oneplus चा OnePlus Nord 3 हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी लाँच केला होता. लाँच होताच या फोनला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. तुम्ही देखील Oneplus चा हा स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छित असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. होय, Amazon वर हा स्मार्टफोन अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. Oneplus लवकरच नवे मॉडेल लाँच करणार आहे. या पार्श्वभूमीवर OnePlus Nord 3 वर मोठी सवलत देण्यात येत आहे, असे म्हटले जात आहे. बघुयात OnePlus Nord 3 वरील आकर्षक ऑफर्स-
Also Read: नव्या आकर्षक रंगात भारतात लाँच झाला लेटेस्ट OnePlus 12, जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील
OnePlus Nord 3 वरील ऑफर्स
OnePlus Nord 3 सध्या Amazon.in वर फक्त 20,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन मागील वर्षी जुलै 2023 मध्ये 33,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला होता. त्यानंतर, कंपनीने आता या फोनवर तब्बल 13,000 रुपयांची थेट सूट ऑफर केली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला Amazon.in वर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. म्हणजेच हा फोन सध्या केवळ 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. मात्र, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. Buy From Here
OnePlus Nord 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 3 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. सुरक्षेसाठी पॅनेल HDR10+ आणि ड्रॅगनट्रेल ग्लासला सपोर्ट करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 9000 चिपसेट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, OnePlus ने 3 वर्षांच्या महत्त्वाचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स आणि 4 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे वचन दिले आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP वाइड लेन्स (Sony IMX890/OIS), 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स दिले आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 16MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Nord 3 मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile