OnePlus Nord 3 5G अप्रतिम ऑफर्ससह Amazon वर उपलब्ध
या फोनवर OneCard क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची झटपट सूट
विशेष म्हणजे फोटोग्राफीसाठी यात नाईट, पोर्ट्रेट, पॅनो, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ इ. फीचर्स मिळतील.
OnePlus ने अलीकडेच OnePlus Nord 3 5G फोन लाँच केला होता. भारतीय ग्राहकांमध्ये OnePlus चे फोन अधिक लोकप्रिय झाले आहेत. हा स्मार्टफोन आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी आली आहे. होय, Amazonवर हा स्मार्टफोन थेट सवलत आणि काही ऑफर्ससह सूचिबद्ध करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोनवरील उपलब्ध ऑफर्स.
OnePlus Nord 3 5G ची किंमत आणि ऑफर्स
Amazon वर स्मार्टफोनची किंमत 33,999 रुपयांपासून सुरू होते. तर, फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही आता Amazon वरून खरेदी केल्यास तुम्हाला OneCard क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची झटपट सूट मिळेल.
एवढेच नाही तर, फोनवर 32,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्याबरोबरच, तुम्ही ते 1,842 रुपयांच्या मासिक हप्त्यावर म्हणजेच EMI वर खरेदी करू शकता. हा फोन मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
OnePlus Nord 3 5G
OnePlus च्या या 5G फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा डिस्प्ले HDR 10+ आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हे Android 13 वर आधारित OxygenOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.
याशिवाय, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 50MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा आहे.
विशेष म्हणजे फोटोग्राफीसाठी यात नाईट, पोर्ट्रेट, पॅनो, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ आणि टाइम-लॅप्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.