OnePlus चे स्मार्टफोन्स कमी किमतीत उत्तम फीचर्स ऑफर करतात.
OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन प्रचंड सवलतीत खरेदी करा.
OnePlus Nord 3 मध्ये Sony IMX890 सेन्सर आणि OIS च्या सपोर्टसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध
OnePlus चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. OnePlus चे स्मार्टफोन्स कमी किमतीत उत्तम आणि भारी फीचर्स ऑफर करण्यासाठी ओळखले जातात. जर तुम्हीही अशाच नवीन स्मार्टफोनचा शोध घेत असाल, तर OnePlus Nord 3 5G हा एक उत्तम पर्याय ठरतो. सध्या या फोनवर खूप प्रचंड मोठी सूट उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन ऑनलाइन मोठ्या सवलतीसह ऑर्डर करू शकता. चला तर मग बघुयात ऑफर्स-
OnePlus Nord 3 5G च्या 8GB RAM+128GB ROM वर सवलत मिळवण्यासाठी, तुम्हाला हा फोन Vijay Sales वरून ऑर्डर करावा लागेल. या वेबसाइटवर सध्या सर्वात मोठी सवलत देण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची MRP 33,999 रुपये आहे आणि 15% डिस्काउंटनंतर तुम्ही हा 28,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनवर एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहेत.
बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HSBC क्रेडिट कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास तुम्ही फोनवर 7.5% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तर, तुम्हाला फेडरल बँक कार्डद्वारे पेमेंटवर 10% सूट उपलब्ध आहे. येस बँकेद्वारे पेमेंट केल्यास 5% सूट देखील उपलब्ध आहे.
OnePlus Nord 3 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 3 5G मध्ये 6.74 इंच लांबीचा सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे. OnePlus चा हा फोन MediaTek Dimensity 9000 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे. तसेच, हा फोन 8GB/16GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज पर्यायासह सादर करण्यात आला आहे. OnePlus Nord 3 मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात Sony IMX890 सेन्सर आणि OIS च्या सपोर्टसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. हा 80W SuperVOOC फास्ट चार्जर उपलब्ध असेल, जो बॉक्समध्ये येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.