5G Upgrade Sale : OnePlus च्या जबरदस्त स्मार्टफोनवर भारी सूट, मोफत मिळेल भरपूर डेटा

5G Upgrade Sale : OnePlus च्या जबरदस्त स्मार्टफोनवर भारी सूट, मोफत मिळेल भरपूर डेटा
HIGHLIGHTS

Amazon वर 5G Upgrade Sale सुरु

OnePlus Nord 2T तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल.

Jio वापरकर्त्यांना 18GB मोफत 4G डेटा मिळेल.

Amazon वर 5G Upgrade Sale सुरु झाला आहे. सेलदरम्यान, OnePlusच्या जबरदस्त लेटेस्ट स्मार्टफोनवर भारी सवलत दिली जात आहे. OnePlus Nord 2T तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. फोनच्या खरेदीवर तुम्हाला 18GB इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. जाणून घेऊयात फोनवरील ऑफर्स – 

किंमत आणि ऑफर्स : 

हा फोन आता फक्त एकाच स्टोरेज व्हेरिएंट 8GB RAM + 128GB मध्ये खरेदी करता येईल. फोन साईटवर 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनच्या खरेदीवर कंपनी ICICI बँक कार्डवर 1,000 रुपयांची सूट देत आहे. तसेच EMI द्वारे देखील तुम्ही फोन खरेदी करू शकता. 1,385 रुपयांच्या EMI वर फोन घरी आणता येईल. Jio वापरकर्त्यांना 18GB मोफत 4G डेटा मिळेल. किमती जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे. येथून खरेदी करा 

OnePlus Nord 2T 

OnePlus Nord 2T 5G मध्ये 6.43-इंच  लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये पंच-होल डिझाइन देण्यात आली आहे. डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यामध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर म्हणून मिळणार आहे. हा फोन Android 12 वर आधारित OxygenOS 12 वर काम करतो.

फोनची विशेषता म्हणजे या फोनमध्ये अलर्ट स्लाईडर देण्यात आला आहे. फोनला पॉवरसाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W SuperVOOC USB Type C फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, 8MP अल्ट्रा वाईड आणि 2MP चा मोनो लेन्स मिळेल. त्याप्रमाणे, समोरील बाजूस 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo