OnePlus 13R Discount: लेटेस्ट स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट, आकर्षक टॉप 5 फीचर्स

Updated on 01-Apr-2025
HIGHLIGHTS

OnePlus ने अलीकडेच जानेवारी महिन्यात OnePlus 13R स्मार्टफोन भारतात लाँच केला.

OnePlus 13R स्मार्टफोनवर जबरदस्त डील उपलब्ध आहे.

OnePlus 13R मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus ने अलीकडेच जानेवारी महिन्यात OnePlus 13R स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. लाँचच्या अवघ्या दोन महिन्यातच हा फोन डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. होय, सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर हा फोन मोठ्या सवलतीसह खरेदी करता येईल. या नव्या फोनवर जबरदस्त डील उपलब्ध आहे. हा फोन 50MP कॅमेरासह 6000mAh बॅटरी मिळत आहे. जाणून घेऊयात OnePlus 13R ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Wow! Vivo V50e मध्ये मिळेल आकर्षक वेडिंग फोटोग्राफी मोड! जबरदस्त फीचर्स उघड, पहा अपेक्षित किंमत

OnePlus 13R ची किंमत आणि ऑफर्स

Oneplus 13R फोनच्या 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Amazon वर 51,999 रुपये आहे. मात्र, सध्या तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन Amazon वर 47,998 रुपयांना खरेदी करू शकता. एवढेच नाही तर, बँक कार्डद्वारे या फोनवर 3000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

oneplus 13r

OnePlus 13R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

OnePlus 13R फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2780x 1264 पिक्सेल आहे.

प्रोसेसर

उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 15 आधारित OxygenOS 15 सह येतो.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, OnePlus 13R मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह येतो. यात 50MP चा सेकेंडरी कॅमेरा आणि 8MP चा थर्ड कॅमेरा सेन्सर आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळत आहेत.

बॅटरी

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 13R फोनची बॅटरी 6000mAh आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

स्टोरेज

OnePlus 13R फोनमध्ये रॅम आणि स्टोरेजचे दोन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. रॅममध्ये 12GB रॅम आणि 16GB चे पर्याय आहेत आणि स्टोरेजमध्ये 256GB आणि 512GB असे दोन पर्याय आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :