OnePlus 12R Discount: लोकप्रिय स्मार्टफोनवर Amazon देतोय तब्बल 5000 रुपयांची सूट, पहा ऑफर
OnePlus 12R कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच केला होता.
Amazon वर OnePlus 12R फोनची किंमत थेट 5,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
फेडरल बँक आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्डवर 3,000 रुपयांची झटपट सूट
फ्लॅगशिप किलरचा लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 12R कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा ब्रँडचा मध्यम श्रेणीचा फ्लॅगशिप फोन आहे. सध्या हा फोन Amazon च्या ब्लॅक फ्रायडे सेलवर स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. Amazon वर या फोनची किंमत थेट 5,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच, इतर ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus 12R ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
OnePlus 12R ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus 12R चा बेस 8GB + 128GB व्हेरिएंट कंपनीने 39,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. जो आता 4,000 रुपयांनी स्वस्त म्हणजेच 35,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. तसेच, 8GB + 256GB आणि 16GB + 256GB कॉन्फिगरेशनची लाँच किंमत 42,999 रुपये आणि 45,999 रुपये इतकी आहे.
मात्र, सेल दरम्यान, 8GB + 256GB व्हेरिएंट 4,000 रुपयांची सुरुवात आणि 16GB + 256GB पर्याय 5,000 रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. सेलदरम्यान, फोनची किंमत अनुक्रमे 38,999 आणि 40,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे फेडरल बँक आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्डवर 3,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. येथून खरेदी करा
OnePlus 12R चे तपशील
OnePlus 12R स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K AMOLED ProXDR 10-बिट LTPO 4.0 डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 बसवण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वापरकर्त्यांना क्वालकॉमचा मजबूत चिपसेट Snapdragon 8 Gen 2 मिळेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज तंत्रज्ञान आहे.
याव्यतिरिक्त, हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. या सेटअपमध्ये OIS सह 50MP Sony IMX890 प्राइमरी, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी EIS सह 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, डिव्हाइस पॉवरफुल 5,500mAh मोठ्या बॅटरीसह येते, जी जलद चार्जिंगसाठी उत्कृष्ट 100W च्या चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या समर्थनासह येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile