आपणा सर्वांना माहित आहे की, आज म्हणजेच 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता फ्लॅगशिप किलरचा लेटेस्ट OnePlus Nord CE 4 भारतात लाँच होणार आहे. मात्र, OnePlus च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, या लाँचपूर्वीच OnePlus 12 च्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. OnePlus 12 सिरीज कंपनीने जानेवारी 2024 मध्ये लाँच केली. हा फोन महागड्या बजेट रेंजच्या स्मार्टफोन्समध्ये मोडतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात OnePlus 12 ची नवी किंमत.
OnePlus 12 चा बेस वेरिएंट 64,999 रुपये किंमतीला लॉन्च करण्यात आला होता, तथापि, जर आपण हाय एंड मॉडेलबद्दल बोललो तर ते 69,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. OnePlus 12 लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याची किंमत कमी झाली आहे. आता स्वस्त दरात फोन खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच ही योग्य वेळ आहे.
सध्या OnePlus 12 च्या किंमतीमध्ये 2% कपात Flipkart वर मिळत आहे. याशिवाय, सिटी बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना EMI व्यवहारांवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. मात्र, जर तुम्ही HSBC क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला त्याद्वारे EMI व्यवहारांवर 1500 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा
OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हे ProXDR डिस्प्ले टेकने सुसज्ज आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय, डिस्प्लेला गोरिला ग्लास व्हिक्टसचा सपोर्ट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 50MP मेन, 3X ऑप्टिकल झूम सह 64MP टेलिफोटो लेन्स आणि 48MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 5400mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे.