Best Offers! लोकप्रिय OnePlus 12 वर मोठ्या Discount सह Amazon वर उपलब्ध, मिळेल 50MP मेन कॅमेरा
OnePlus 12 सिरीजअंतर्गत OnePlus 12 आणि OnePlus 12R असे दोन मॉडेल्स सादर
सध्या Amazon वर OnePlus 12 फोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे.
OnePlus 12 चा कॅमेरा 1080p वर 30fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करतो.
OnePlus ने या वर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात आपली नंबर सिरीज OnePlus 12 लाँच केली होती. या सिरीजअंतर्गत OnePlus 12 आणि OnePlus 12R असे दोन मॉडेल्स सादर केले होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, सध्या Amazon वर OnePlus 12 फोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. एवढेच नाही तर, या फोनवर बँक ऑफर्स, EMI आणि इतर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात OnePlus 12 वरील ऑफर्स-
OnePlus 12 वरील ऑफर्स
OnePlus 12 स्मार्टफोनची किंमत 64,999 रुपयांपासून सुरू होते. फोनचा टॉप व्हेरिएंट 69,999 रुपयांना येतो.OnePlus 12 स्मार्टफोन सध्या Amazon वरून खरेदी केल्यास 7000 रुपयांची मोठी सूट मिळत आहे. Amazon ही ऑफर ICICI बँक कार्डसह देत आहे. तसेच, हा फोन 3,006 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ऑफर केला जातो. यामध्ये फ्लोई एमव्हरल्ड, ग्लेशियल व्हाईट आणि सिल्की ब्लॅक या कलर्सचा समावेश आहे. येथून खरेदी करा
OnePlus 12 चे फीचर्स आणि स्पेक्स
OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच लांबीचा QHD+ LTPO डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 4500nits आहे. प्रोटेक्शनसाठी, हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. तर, स्टोरेज सेक्शनमध्ये, हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. तर, स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी या OnePlus 12 स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या सेटअपमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा 1080p वर 30fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करतो. फोन फेस अनलॉक, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ आणि स्क्रीन फ्लॅशसह उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC आणि 50W AIRVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile