OnePlus 11R वर मिळतोय तब्बल 12 हजार रुपयांचा Discount, 50MP कॅमेरासह मिळेल Powerful फीचर्स

Updated on 21-Jun-2024
HIGHLIGHTS

OnePlus 11R वर मोठ्या सवलतींसह खरेदी करण्याची संधी

OnePlus 11R साठी बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1,500 रुपयांपर्यंत सूट

OnePlus 11R स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी अप्रतिम फीचर्सच्या समर्थनासह येतो.

2024 च्या सुरुवातीला फ्लॅगशिप किलर OnePlus ने OnePlus 12 सिरीज लाँच केली आहे. लेटेस्ट स्मार्टफोन सिरीर्ज लाँच झाल्यांनतर जुने मॉडेल्स स्वस्त आणि आकर्षक सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला OnePlus 11R वर मिळणाऱ्या सवलतींबद्दल सांगणार आहोत. हा फोन Amazon India वर अप्रतिम डिस्काउंटसह उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ घालवता OnePlus 11R ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स जाणून घेऊयात.

Also Read: Realme Narzo Week Sale: लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त Discount, आकर्षक सवलती उपलब्ध

OnePlus 11R ची किंमत आणि ऑफर्स

या OnePlus फोनची MRP 39,999 रुपये आहे. नुकतेच Amazon वर विक्री सुरु झाली आहे. सेलदरम्यान 30% डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन आता केवळ 27,999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर अनेक बँक डिस्काउंटही उपलब्ध आहेत. बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. फोनच्या EMI व्यवहारांवर वेगळी सूट मिळणार आहे. येथून खरेदी करा

ONEPLUS 11R

एवढेच नाही तर, जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर, त्या बदल्यात तुम्हाला 25,000 रुपयांची सूट मिळू शकते. पण यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, कंपनी या प्रोडक्टवर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत ​​आहे. OnePlus 11R चे सोनिक ब्लॅक आणि गॅलेक्टिक सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

OnePlus 11R चे फीचर्स आणि स्पेक्स

OnePlus 11R मध्ये 6.74-इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटच्या समर्थनासह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC द्वारे समर्थित आह. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.3, NFC आणि GPS यांचा समावेश आहे.

फोटोग्राफीसाठी, फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 50MP चा सोनी IMX890 प्राथमिक सेन्सर, 8MP चा अल्ट्रा वाइड-एंगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या वरच्या मध्यभागी होल-पंच कटआउटमध्ये ठेवला आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 100W फ्लॅश फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :