Best Offer! आतापर्यंतच्या स्वस्त किमतीत मिळतोय Oneplus 11R, बघा किंमत आणि सर्व ऑफर्स। Tech News 

Best Offer! आतापर्यंतच्या स्वस्त किमतीत मिळतोय Oneplus 11R, बघा किंमत आणि सर्व ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

लोकप्रिय स्मार्टफोन Oneplus 11R वर मिळतोय बंपर डिस्काउंट

Oneplus 11R स्मार्टफोन Amazon वर 12,000 रुपयांच्या सवलतीसह सूचिबद्ध

Oneplus 11R फोन EMI ऑप्शनसह सहज खरेदी करता येईल.

2024 च्या सुरुवातीला फ्लॅगशिप किलर Oneplus ने आपली नवी नंबर सिरीज Oneplus 12 लाँच केली होती. त्यानंतर कंपनीने जुने मॉडेल्स मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Oneplus 11R वर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. हा फोन तुम्हाला Amazon वरून अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Oneplus 11R ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: आगामी Realme GT 6 फोनची लाँच डेट Confirm! ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, बघा सर्व लीक्स

Oneplus 11R ची किंमत आणि ऑफर्स

Oneplus ने OnePlus 11R 5G फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 39,999 रुपयांच्या किमतीत सादर केला होता. हा फोन सध्या Amazon वर केवळ 27,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करून देण्यात आला आहे. होय, या फोनवर सध्या तब्बल 12,000 रुपयांचा बम्पर डिस्काउंट मिळत आहे. त्याबरोबरच, हा फोन EMI ऑप्शनसह देखील खरेदी करता येईल. तुम्ही दरमहा 1,357 रुपये देऊन हा फोन खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Oneplus 11R Price cut
OnePlus 11 5G price cut

Oneplus 11R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला उत्कृष्ट इमेज कॉलिटी, फास्ट ऑटोफोकस आणि हाय डायनॅमिक रेंज (HDR) आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सारख्या फीचर्ससाठी समर्थन मिळेल. तसेच, हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला होता.

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि मॅक्रो सेन्सर देखील समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 100W Supervooc फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo