Best Offer: 50MP ट्रिपल कॅमेरा असलेला OnePlus फोन पुन्हा झाला स्वस्त, यावेळी मिळतोय प्रचंड Discount

Updated on 08-Nov-2023
HIGHLIGHTS

OnePlus चा लोकप्रिय OnePlus 11 स्मार्टफोन पुन्हा एकदा स्वस्त झाला आहे.

Amazon India कडून या फोनवर चांगली सूट दिली जात आहे.

हा फोन विशेषतः फोटोग्राफीसाठी उत्तम मानला जातो

प्रसिद्ध ब्रँड OnePlus चा लोकप्रिय OnePlus 11 स्मार्टफोन पुन्हा एकदा स्वस्त झाला आहे. होय, Amazon India कडून या फोनवर चांगली सूट दिली जात आहे. इतकंच नाही, तर अनेक बँक कार्ड्सच्या माध्यमातून फोनवर भरघोस सूटही देण्यात येत आहे. Amazon चा हा सेल 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला जरा घाई करावी लागेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus 11 च्या किमतीत घट झाल्यानंतर आता फोनची किंमत 50,748 रुपये इतकी राहिली आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता, पुढे तुम्हाला फोनवर उपलब्ध असलेल्या आश्चर्यकारक डीलबद्दल जाणून घेऊयात.

OnePlus 11 वरील उपलब्ध सर्व ऑफर्स

OnePlus 11 स्मार्टफोन Amazon India वर 56,998 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना या फोनवर 4000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील मिळत आहे. तुम्हाला फोन खरेदी करताना फक्त या ऑफरवर टिक करावे लागेल. यानंतर फोनची किंमत केवळ 52,998 रुपये इतकी खाली येईल.

OnePlus 11 वरील उपलब्ध बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक क्रेडिट कार्ड्सद्वारे 2250 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. या ऑफरसह फोनची किंमत फक्त 50,748 रुपये इतकी कमी होते. म्हणजेच, तुम्हाला OnePlus 11 वर सुमारे 6,250 रुपयांची सूट दिली जात आहे. जर तुम्ही OnePlus लव्हर असाल आणि तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोन हवा असेल तर, या ऑफरसह OnePlus 11 खरेदी करणे अगदी योग्य ठरेल. येथून खरेदी करा

OnePlus 11 चे मुख्य तपशील

हा फोन विशेषतः फोटोग्राफीसाठी उत्तम मानला जातो. OnePlus 11 मध्ये ट्रिपल कॅमेरा लेन्स उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 32MP टेलिफोटो लेन्स मिळेल. त्यासह तुम्ही अप्रतिम फोटोग्राफी करण्यास सक्षम असाल. म्हणजेच या कॅमेरासह तुम्ही कोणत्याही प्रकाशाच्या स्थितीत उत्तम फोटो क्लिक करू शकता. याशिवाय तुम्ही 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

आता या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन तुम्हाला सिंगल चार्जमध्ये संपूर्ण दिवस वापरता येणार आहे. यासाठी यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यासह, 100W फास्ट चार्जिंग देखील उपलब्ध आहे. हा फोन फक्त 30 मिनिटांत 100% चार्ज करण्याची क्षमता प्रदान करतो. तसेच, वेब सर्फिंग सारख्या मूलभूत कार्यांसह ही बॅटरी दोन दिवस टिकू शकते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :