Amazon आणि OnePlus भारतात OnePlus 10T 5G मोठ्या सवलतीत देत आहेत. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक रॅम असलेला स्मार्टफोन आहे. हा डिवाइस 16GB रॅम सह 8GB आणि 12GB वेरिएंट मध्ये देखील उपलब्ध आहे. तुम्हालाही हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या खास ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा : या आठवड्यात Netflix वर पहा 'हे' पाच चित्रपट, ही आहे संपूर्ण यादी
OnePlus 10T 5G चा 8GB RAM + 128GB स्टोरेज हँडसेट Amazon वर 49,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला 3,000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, कोटक बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर 1500 रुपयांची त्वरित सूट आहे.त्याचप्रमाणे, स्टँडर्ड चार्टर्ड क्रेडिट कार्ड वापरण्यावर 1,500 रुपयांपर्यंत सूट आहे.
याव्यतिरिक्त, जुना फोन एक्सचेंज केल्यावर खरेदीदारांना 15,750 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यासोबत, तुम्ही EMI वर 2,354 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता. अशाप्रकारे, तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफर या दोन्हीच्या सवलतीचा लाभ घेतल्यास तुम्हाला 18 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळण्याची शक्यता आहे.
OnePlus 10T 5G पावरफुल Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट, 150W SUPERVOOC टेक्नॉलॉजी, 16GB LPDDR5 रॅमसह येतो. स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल Sony IMX769 सेन्सर आहे.
त्याबरोबरच, यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी घेण्यासाठी फ्रंटला 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. OnePlus 10T मध्ये, तुम्हाला 4,800mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 160W फास्ट चार्जरसह येते. फोनची बॅटरी फक्त 19 मिनिटांत 100% चार्ज होते.