नवीनतम स्मार्टफोन सिरीज OnePlus 12 सिरीज भारतात लाँच
हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची सवलत मिळत आहे.
या 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
OnePlus ने नुकतेच आपली नवीन स्मार्टफोन सिरीज OnePlus 12 सिरीज भारतात लाँच केली आहे. नवे स्मार्टफोन्स लाँच होताच या सीरिजला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, जुने मॉडेल म्हणजेच OnePlus 10R 5G वर भारी डिस्काउंट दिला जात आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनवर Amazon अप्रतिम ऑफर्स देखील देत आहे. बघुयात OnePlus 10R 5G वरील सवलत-
OnePlus 10R 5G ची किंमत आणि डिस्काउंट
OnePlus 10R 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या Amazon वरून हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची सवलत मिळत आहे. मात्र, ही ऑफर फक्त ICICI बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. यावर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. या फोनमध्ये फॉरेस्ट ग्रीन, प्राइम ब्लू आणि सिएरा ब्लॅक तीन कलर ऑप्शन्स मिळतील. येथून खरेदी करा
OnePlus 10R 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 10R 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये MTK D8100 Max प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 12 वर आधारित OxygenOS वर चालतो. स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP Sony IMX766 सेन्सर, ड्युअल LED फ्लॅशसह 2MP मॅक्रो लेन्स आहे. या 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. उत्तम फोटोग्राफीसाठी यात प्रो मोड, पोर्ट्रेट मोड, HDR सपोर्ट आणि अनेक फीचर्स आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mah बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.