कमी किमतीत मिळतोय Oneplus 10R, लिमिटेड टाइम ऑफर

Updated on 20-Apr-2023
HIGHLIGHTS

Amazon वर Oneplus 10R 5G वर मोठी सूट

साईटवर या फोनवर पूर्ण दहा टक्के सूट मिळतेय.

हा फोन ब्लॅक, प्राईम ब्लु आणि फॉरेस्ट ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल.

 Oneplus भारतात झपाट्याने आपले मार्केट वाढवत आहे. कंपनीच्या प्रोडक्ट्सना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आणि पसंती आहे. जर तुम्हाला Oneplus चा फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. Amazon वर Oneplus 10R 5G वर मोठी सूट दिली जात आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, त्यामुळे वेळ न घालवता ऑफर्स बघुयात- 

Oneplus 10R 5G वरील ऑफर्स

Oneplus 10R 5G वर Amazon सध्या मोठी सवलत देतोय. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 38,999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र साईटवर या फोनवर पूर्ण दहा टक्के सूट मिळतेय. या सुटसह फोन 34,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. 

याशिवाय, फोनचे पेमेंट जर बँक कार्डने करायचे असेल तर, यावर बँक ऑफर्सदेखील मिळतील. यावर ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने व्यवहार केल्यास संपूर्ण तीन हजार रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. या व्यतिरिक्त, काही निवडक कार्ड्सवर देखील ऑफर्स आहेत. हा फोन ब्लॅक, प्राईम ब्लु आणि फॉरेस्ट ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. 

फीचर्स आणि स्पेक्स

Oneplus 10R 5G मध्ये तुम्हाला 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले मिळणार आहे, त्यासोबत 120Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात Mediatek Dimensity 8100 Max प्रोसेसर दिला गेला आहे. यात तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय मिळेल. 

त्याबरोबरच फोनमध्ये 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग समर्थनासह येते. फोनमध्ये 50MP Sony IMX766 प्रोसेसरसह 2MP मॅक्रो कॅमेरा दिला गेला आहे. तसेच, समोरील बाजूस 16MP चा कॅमेरा दिला गेला आहे.   

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :