OnePlus चा 5G स्मार्टफोनची किंमत झाली कमी, नवी किंमत बजेटमध्ये आहे का?

OnePlus चा 5G स्मार्टफोनची किंमत झाली कमी, नवी किंमत बजेटमध्ये आहे का?
HIGHLIGHTS

OnePlus 10 Pro 5G फोन झाला स्वस्त

सध्या हा फोन 17 हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह सूचीबद्ध

Flipkart वर मिळतेय ही भारी सवलत

OnePlus स्मार्टफोन विश्वातील एक लोकप्रिय ब्रँड आहे. मात्र, या ब्रँडचे स्मार्टफोन्स खरेदी करताना खिशाला जरा ताण द्यावा लागतो. या फोनची किंमत प्रत्येकाच्या खिशाला परडणारी असेलचं, असे नाही. पण OnePlus प्रेमींसाठी आज आम्ही आनंदाची बातमी आणली आहे. OnePlus चा 5G फोन म्हणजेच OnePlus 10 Pro 5G फ्लिपकार्टवर कमी किमतीत उपलब्ध आहे. 

OnePlus 10 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

OnePlus 10 Pro 5G ची एमआरपी फ्लिपकार्टवर 66,999 रूपये इतकी आहे. पण सध्या हा फोन 17 हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह सूचीबद्ध आहे. हा फोन 49,999 रुपयांना उपलब्ध आहे. काही बँक कार्डद्वारे व्यवहार केल्यास एक हजार रुपयांर्यंतचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. याव्यतरिक्त, एक्सिस बँक कार्डद्वारे व्यवहार केल्यास 5% कॅशबॅक देखील मिळतो. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टला भेट द्या. 

OnePlus 10 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

 OnePlus 10 Pro मध्ये, कंपनी 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा QHD + AMOLED डिस्प्ले देत आहे. फोनमधील हा डिस्प्ले 120Hz चा रीफ्रेश रेट आणि 1300 nits चा पीक ब्राइटनेस लेव्हल ऑफर करतो. फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट मिळणार आहे.

OnePlus च्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन 80W फास्ट आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेला हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये NFC सपोर्ट आणि ब्लूटूथ 5.2 व्यतिरिक्त सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन्स देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी फोनचा मागील बाजूस LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्ससह 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. कंपनी आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo