Best Offer! लेटेस्ट Nothing Phone (2a) भारी Discount सह उपलब्ध, सोनेरी डील पुन्हा मिळणार नाही
Nothing ने अलीकडेच भारतात आपला नवा Nothing Phone (2a) लाँच केला.
Nothing Phone (2a) सध्या Flipkart वर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे.
SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1000 रुपयांची सूट
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing ने अलीकडेच भारतात आपला नवा Nothing Phone (2a) लाँच केला. कंपनीचे फोन आपल्या अनोख्या आणि ट्रान्सपरंट लुकसाठी प्रसिद्ध आहेत. हा फोन सध्या Flipkart वर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. सवलतीसह तुम्हाला बँक ऑफर्स, EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा, 5000mAh बॅटरी असे पॉवरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मिळतील. जाणून घेऊयात Nothing Phone (2a) ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: महागड्या Realme स्मार्टफोनवर मिळतेय हजारो रुपयांची सूट! Best ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी
Nothing Phone (2a) वरील ऑफर्स
Nothing Phone (2a) 5G फोनचे 8GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वरून 21,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर उपलब्ध असलेली बँक कार्ड डील देखील तुमच्यासाठी फायदेशीर असेल. हा फोन SBI बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. तुम्हाला फोनवर 774 रुपयांची EMI सुरू करण्याचा पर्याय देखील मिळत आहे.
एक्सचेंज ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी असल्यास यावर तुम्हाला 13,550 रुपयांची ऑफर उपलब्ध आहे. एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबवून असेल. येथून खरेदी करा
Nothing Phone (2a) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Nothing Phone (2a) 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2412 x 1084 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Mediatek Dimensity 7200 Pro प्रोसेसरनद्वारे सुसज्ज आहे. फोनच्या मागील बाजूस एक अद्वितीय Glyph Interface देखील देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील.
त्याबरोबरच, कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास Nothing Phone (2a) 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 50MP सेकंडरी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile