Nothing Phone (2) वर मिळतोय तब्बल 10,000 रुपयांचा Discount, फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतायेत Best ऑफर्स

Updated on 29-Dec-2023
HIGHLIGHTS

सध्या Flipkart वर Winter Fest सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर सवलत उपलब्ध आहे.

Nothing Phone (2) वर मिळतेय तब्बल 10,000 रुपयांची सूट

उत्तम कार्यप्रदर्शनासाठी हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

जर तुम्ही ट्रान्सपरंट डिझाइनसह येणारा पॉप्युलर Nothing Phone (2) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या सुरु असणाऱ्या इयर एन्ड सेलचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. सध्या Flipkart वर Winter Fest सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर सवलत उपलब्ध आहे. होय, या सेलदरम्यान तुम्हाला Nothing Phone (2) वर प्रचंड डिस्काउंट ऑफर्स मिळतील. यासह तुम्ही हा फोन अगदी स्वस्तात आणि तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात फोनवरील उपलब्ध सर्व ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Samsung च्या Best Seller स्मार्टफोनच्या किमतीत प्रचंड मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत। Tech News

Nothing Phone (2) वरील ऑफर्स

Nothing Phone (2) च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 49,999 रुपये आहे. नथिंग फोन (2) च्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास Flipkart वर तब्बल 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या मोठ्या डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला 39,999 रुपयांना खरेदी करता येईल. एवढेच नाही तर, तुमच्याकडे जुना फोन एक्सचेंजसाठी असेल तर, या फोनवर तुम्हाला 27,400 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. येथून खरेदी करा

Nothing Phone (2) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (2) फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसह उत्तम कार्यप्रदर्शनासाठी हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB आणि 2GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. तर, दुसरा कॅमेरा 50MP चा देण्यात आला आहे. तर, सेल्फीच्या शौकीन असलेल्या युजर्ससाठी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगकरीत 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, नथिंग फोन (2) मध्ये 4,700mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W वायर्ड आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :