50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह येणाऱ्या Nothing Phone 2 वर मिळतोय प्रचंड Discount, बघा Best डील

Updated on 24-Apr-2024
HIGHLIGHTS

Nothing Phone 2 वर फ्लिपकार्ट सेलदरम्यान मोठी सवलत दिली जात आहे.

स्मार्टफोनची किंमत Flipkart वर एक्सट्रा 17,000 रुपयांच्या ऑफसह सूचीबद्ध

या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.

सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर Flipkart वर मंथ एंड सेल सुरू आहे. या सेलदरम्यान अनेक महागडे स्मार्टफोन तुम्हाला अगदी निम्म्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून दिले गेले आहेत. यामध्ये पारदर्शक डिझाईनसह येणारा Nothing Phone 2 देखील सामील आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या डिव्हाईसवर उत्तम ऑफर्स दिले जात आहे. या ऑफर्ससह फोन अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग, जाणून घेऊयात Nothing Phone 2 ची किंमत, फीचर्स आणि सर्व ऑफर्स-

Nothing Phone 2 Price cut

Nothing Phone 2 ची किंमत आणि ऑफर्स

Nothing Phone 2 स्मार्टफोनची किंमत Flipkart वर एक्सट्रा 17,000 रुपयांच्या ऑफसह 37,999 रुपयांपासून सुरू होते. वर सांगितल्याप्रमाणे, सेलदरम्यान या फोनवर अनेक प्रकारचे ऑफर्स उपलब्ध आहेत. ICICI बँकेकडून Nothing Phone 2 वर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, या फोनवर 33 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 1,336 रुपयांचे EMI ऑफर देखील दिली जात आहे. Buy From Here

Nothing Phone 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone 2 मध्ये 6.7 इंच लांबीचा HD Plus AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. जेव्हा एक्सट्रीम गेमिंगचा विचार केला जातो, तेव्हा 8 Plus Gen 1 हा एक चांगला पर्याय आहे. ही डील Nothing Phone 2 च्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.

Nothing Phone (2a) 5G Features

याव्यतिरिक्त, Nothing Phone 2 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मेन आणि 50MP सेकंडरी सेन्सर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. आकर्षक व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4700mAh ची मजबूत बॅटरी उपलब्ध आहे, जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :