आकर्षक Motorola Razr 50 फ्लिप फोन सवलतीसह खरेदी करण्याची संधी, तब्बल 14,000 रुपयांचा Discount

Updated on 09-Oct-2024
HIGHLIGHTS

Motorola Razr 50 फोन गेल्या महिन्यातच भारतात लाँच करण्यात आला आहे.

Motorola Razr 50 या फोनवर सध्या 5000 रुपयांची डिस्काउंट ऑफर

Motorola Razr 50 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola च्या Motorola Razr 50 फोन गेल्या महिन्यातच भारतात लाँच करण्यात आला आहे. सध्या जिकडे तिकडे फ्लिप आणि फोल्डेबल फोन्सची क्रेझ दिसत आहे. आता तुम्ही Motorola चा हा फ्लिप फोन Amazon GIF सेलदरम्यान मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. दिवाळीपूर्वीच या फ्लिप स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घसरण दिसत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Razr 50 वरील ऑफर्स-

Also Read: Lava Agni 3 Sale: ड्युअल डिस्प्लेसह येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोनवर ऑफर्सचा वर्षाव, जाणून घ्या किंमत आणि विशेषता

Motorola Razr 50 ची किंमत आणि ऑफर्स

Motorola Razr 50 स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 64,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर सध्या 5000 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. त्याबरोरबच, SBI बँक कार्डद्वारे फोनवर 9000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे, तुम्ही Motorola Razr 50 फोनच्या खरेदीवर तुमची तब्बल 14,000 रुपयांची बचत होणार आहे. येथून खरेदी करा

Motorola Razr 50 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Razr 50 हा फ्लिप फोन भारी आणि आकर्षक लुकसह येतो. या फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले देखील आहे. यासोबतच, 3.63 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300X प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ज्यामध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.

फोटोग्राफीसाठी, Motorola Razr 50 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 13MP सेकंडरी कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनची बॅटरी 4200mAh आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. यात 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :