Best Offer! लोकप्रिय फ्लिप फोन Motorola Razr 50 Ulltra वर मिळेल तब्बल 10,000 रुपयांचा Discount, इयरबड्स देखील Free

Updated on 18-Sep-2024
HIGHLIGHTS

Motorola चा लेटेस्ट Razr 50 Ultra स्मार्टफोन कंपनीने जुलैमध्ये लाँच केला होता.

Motorola चा लेटेस्ट Razr 50 Ultra स्मार्टफोन सध्या 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध

Motorola Razr 50 Ultra सवलतीसह ऑफलाईन रिटेल स्टोअर आणि Amazon India वरून खरेदी करता येईल.

सध्या सर्वत्र फोल्डेबल आणि फ्लिप स्मार्टफोनचे ट्रेंड सुरु आहे. मात्र, हे स्मार्टफोन हाय बजेट श्रेणीमध्ये येतात, त्यामुळे हे फोन्स खरेदी करण्यासाठी बजेटचे नियोजन करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला देखील नवा फ्लिप स्मार्टफोन हवा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. होय, Motorola चा लेटेस्ट Razr 50 Ultra स्मार्टफोन सध्या 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Razr 50 Ultra ची किंमत आणि ऑफर्सचे सविस्तर तपशील-

Also Read: नवा Samsung Galaxy F05 फोन Powerful फीचर्ससह भारतात लाँच, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी

Motorola Razr 50 Ultra वरील ऑफर्स

लेटेस्ट Motorola Razr 50 Ultra भारतात 10,000 च्या सवलतीसह 89,999 रुपयांना Amazon वर सूचिबद्ध आहे. हा फोन ब्रँडने जुलैमध्ये 99,999 रुपयांना लाँच केला होता. मात्र, अवघ्या तीन महिन्यांच्या आतच स्मार्टफोनवर 10,000 रुपयांची सवलत मिळत आहे. हा Motorola Razr 50 Ultra फोन मिडनाईट ब्लू, पीच फज आणि स्प्रिंग ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

यासह ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यावर नो-कॉस्ट EMI ऑप्शन मिळणार आहे. तर, स्मार्टफोनवर तुम्हाला 17,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. Motorola Razr 50 Ultra सवलतीसह ऑफलाईन रिटेल स्टोअर आणि Amazon India वरून खरेदी केला जाऊ शकतो. यासह तुम्हाला बॉक्समध्ये Moto Buds देखील मिळणार आहेत. Buy From Here

Motorola Razr 50 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Razr 50 Ultra मध्ये 6.9-इंच लांबीचा FHD+ poled LTPO मुख्य डिस्प्ले 165Hz रिफ्रेश रेटसह आहे. तर, यात 4 इंच लांबीचा pOLED LTPO बाह्य डिस्प्ले 165Hz रिफ्रेश रेटसह आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस बसवण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Motorola Razr 50 Ultra फोन Qualcomm Snapdragon 8S Gen 3 चिपसेटसह येतो. स्टोरेजसाठी डिव्हाइसमध्ये 12GB LPDDR5X रॅमसह 512GB UFS 4.0 अंतर्गत स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी, Moto Razr 50 Ultra मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि OIS सह 50MP 2x टेलिफोटो कॅमेरा लेन्स उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी आहे, जी 45W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येईल. एवढेच नाही तर, हा फोन 15W वायरलेस चार्जिंगने सुसज्ज आहे.

डिस्क्लेमर: या लेखामध्ये संलग्न म्हणजे एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :