Amazon Great Indian Festival Sale अवघ्या दोन दिवसांमध्ये सुरु होणार आहे. जरी अधिकृतपणे हा सेल 8 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे, परंतु Amazon प्राइम सदस्यांसाठी हा सेल आज मध्यरात्री 12 वाजतापासून सुरु होणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही प्राईम मेम्बर असाल तर तुम्हाला एक दिवस आधी डील्सचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. त्याआधीच Kickstarters Deals लाईव्ह करण्यात आले आहेत. बऱ्याच स्मार्टफोन्सवरील मिळणाऱ्या डिल्स देखील जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे Motorola चा लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे.
ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 दरम्यान, Motorola Razr 40 स्मार्टफोनवर तब्बल 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या सेल दरम्यान, स्मार्टफोन Amazon वर 44,999 रुपयांना विकला जाणार आहे. या फोनच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. लॉन्चच्या वेळी हा फोन 59,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता.
आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या हा फोन 49,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज नंतर, तुम्हाला फोन अतिशय स्वस्त किंमतीत मिळणार आहे. बँक ऑफर म्हणून, फोन 5000 रुपयांच्या अतिरिक्त Discount सह खरेदी केला जाऊ शकतो.
हा फोन 6.9-इंच लांबीच्या LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, यासह फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 1.47-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देखील आहे. स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे, या प्रोसेसरसह 20% वेगवान ग्राफिक्स आणि 30% चांगले AI कार्यप्रदर्शनची अपेक्षा करता येते. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देखील आहे.
फोनमध्ये 64MP ड्युअल कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. त्याबरोबरच, तुम्हाला फोनमध्ये 4200mAh ची नॉन रिमूव्हेबल बॅटरी मिळणार आहे. तुम्हाला जर फोल्डेबल फोन हवा असेल तर तर सेलदरम्यान तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. कारण नंतर हा फोन परत कधी इतक्या डिस्काउंटसह मिळेल, काही सांगता येत नाही.