Motorola Edge 50 Neo वर जबरदस्त Discount उपलब्ध! जाणून घ्या अप्रतिम डील आणि Powerful स्पेक्स
Motorola ने Motorola Edge 50 Neo अलीकडेच भारतात लाँच केला होता.
Motorola Edge 50 Neo फोनच्या विशेष किंमतीवर 6000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
Motorola Edge 50 Neo फोन IP68 MIL810H मिलिटरी ग्रेड प्रमाणित रेटिंगसह सुसज्ज आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने Motorola Edge 50 Neo अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन IP68 MIL810H मिलिटरी ग्रेड प्रमाणित रेटिंगसह सुसज्ज आहे. म्हणजेच, या फोनची ताकद एवढी आहे की, हा फोन पडल्यास किंवा पाण्यात बुडूनही तो खराब होणार नाही. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Motorola Edge 50 Neo हँडसेटवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. या डीलद्वारे कमी किंमतीत डिव्हाइस खरेदी करता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 Neo ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 लाँच डेट जाहीर! ‘या’ दिवशी जागतिक बाजारात होणार जबरदस्त Entry
Motorola Edge 50 Neo वरील ऑफर्स
Motorola Edge 50 Neo कंपनीच्या साइटवर आणि Flipkart वर 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी 23,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. फोनच्या विशेष किंमतीवर 6000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. यासह तुम्हाला अनेक ऑफर्स देखील मिळणार आहेत. कंपनीच्या साइटवर Axis बँक आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट वापरून 1000 रुपयांची सूट मिळेल. या कार्डवरून फोन 6 महिन्यांच्या नो कॉस्ट EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. बजाज फिनसर्व्ह कार्डच्या मदतीने फोन खरेदी केल्यावर 250 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचा नो कॉस्ट EMI वर डिव्हाइस खरेदी करता येईल.
Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 5% अमर्यादित कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. मात्र, सध्या हा फोन केवळ लाँच किंमतीवर विकला जात आहे. पण, हा फोन बँक कार्ड आणि एक्सचेंज ऑफर वापरून स्वस्तात खरेदी करता येईल. हा फोन नॉटिकल ब्लू, लेट, ग्रिसेल आणि पॉइन्सियाना या कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा
Motorola Edge 50 Neo चे फीचर्स आणि स्पेक्स
Motorola Edge 50 Neo स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच लांबीचा रुंद सुपर HD LTPO डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. उत्तम कार्यक्षमतेसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS सह 50MP Sony LYTIA 700C प्राथमिक कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड/मॅक्रो कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो लेन्स आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, मोबाईलमध्ये 4310mAh ची बॅटरी आहे, 15W वायरलेस चार्जिंग आणि 68W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगसाठी समर्थन आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile