आकर्षक डिझाईनसह येणाऱ्या Motorola Edge 50 Fusion वर मिळतोय भारी Discount, पहा Best डील 

आकर्षक डिझाईनसह येणाऱ्या Motorola Edge 50 Fusion वर मिळतोय भारी Discount, पहा Best डील 
HIGHLIGHTS

Motorola कडे मिड बजेट श्रेणीमध्ये अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.

Flipkart स्वस्त किमतीत फोन खरेदी करण्याची उत्तम संधी देत ​​आहे.

हा फोन तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत अनेक Powerful फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑफर करतो.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola कडे मिड बजेट श्रेणीमध्ये अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही 25,000 रुपयांच्या बजेटमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Flipkart स्वस्त किमतीत फोन खरेदी करण्याची उत्तम संधी देत ​​आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Motorola Edge 50 Fusion फोनबद्दल माहिती देणार आहोत. हा फोन तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत अनेक Powerful फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑफर करतो. जाणून घेऊयात Motorola Edge 50 Fusion ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: लेटेस्ट Infinix Smart 9 HD भारतीय बाजारात लाँच! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी

motorola edge 50 fusion

Motorola Edge 50 Fusion ची किंमत आणि ऑफर्स

Motorola Edge 50 Fusion चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट Flipkart वर 23,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. तर, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा फोन गेल्या वर्षी मे महिन्यात 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, IDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 2,500 रुपयांची सूट मिळू शकते, त्यानंतर हा फोन तुम्ही केवळ 21,499 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Motorola Edge 50 Fusion चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 50 Fusion मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा कर्व pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Snapdragon 7S Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. हाय-रिझोल्यूशन व्हिडिओ प्लेबॅक असो, इमर्सिव्ह गेमिंग असो किंवा मल्टीटास्किंग असो, Snapdragon 7S Gen 2 मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोनसाठी उत्कृष्ट पर्याय म्हणून ओळखल जातो.

Motorola-Edge-50-Fusion launched in India

फोटोग्राफीसाठी, कॅमेरा सेटअपच्या बाबतीत Motorola Edge 50 Fusion मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS सपोर्टसह 50MP Sony LYT 700C प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 13MP अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 68W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, ड्युअल सिम सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo