प्रसिध्द स्मार्टफोन निर्माता Motorola ने अलीकडेच Motorola edge 50 Fusion स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने मिड रेंज मध्ये सादर केला गेला आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन आता प्रसिध्द इ-कॉमर्स साईट Flipkart वर मोठ्या सवलातींसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्हाला यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Motorola edge 50 Fusion ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: फक्त 15,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 43 इंच Smart TV, अप्रतिम ऑफर्ससह Amazon वर उपलब्ध
Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये आहे. या फोनचा टॉप व्हेरिएंट 24,999 रुपयांना येतो. हा स्मार्टफोन Motorola च्या अधिकृत वेबसाइट किंवा Flipkart वरून खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, IDFC आणि ॲक्सिस बँक कार्डवर 2000-2000 रुपयांची थेट सूट मिळेल. तसेच, HDFC कार्डवर 2250 रुपयांची सूट आहे.
हा फोन सहज EMI वर देखील खरेदी करता येईल. तसेच, फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. हा फोन फॉरेस्ट ब्लू, फॉरेस्ट ग्रीन, हॉट पिंक आणि मार्शमॅलो ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये येईल. येथून खरेदी करा
Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश दर 144Hz इतका आहे. हा मोटोरोला हँडसेट कॉर्निंग ग्लास 5 प्रोटेक्शन एसजीएस लो ब्लू लाइट आणि एसजीएस लो मोशन ब्लरसह येतो. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये Octa-core 4nm Qualcomm SM7435-AB Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, Motorola Edge 50 Fusion च्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. मागील बाजूस LED फ्लॅश, HDR सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.
दरम्यान, फ्रंट कॅमेरा 4K मध्ये 30fps आणि 30fps वर 1080p रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतो. ड्युअल कॅप्चर, स्पॉट कलर, पोर्ट्रेट, लाइव्ह फिल्टर, ग्रुप सेल्फी, प्रो मोड आणि ऑटो स्माईल कॅप्चर यासारखे अनेक कॅमेरा फीचर्स फोनमध्ये देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी, हा मोटोरोला स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो, जो TurboPower 68W चार्जिंगला सपोर्ट करतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.