50MP कॅमेरा आणि 3D कर्व स्क्रीनसह येणार Moto G85 5G वर मोठी सूट, जाणून घ्या Best ऑफर

Updated on 16-Oct-2024
HIGHLIGHTS

Motorola ने जुलै महिन्यात Moto G85 5G फोन भारतात लाँच

Moto G85 5G कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला होता.

सध्या ब्रँडने Moto G85 5G दोन्ही मॉडेल्सवर 1000 रुपयांची सवलत दिली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने जुलै महिन्यात आपला पॉवरफुल 5G स्मार्टफोन Moto G85 भारतात लाँच केला होता. हा डिवाइस कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला होता. त्यानंतर आता या फोनवर ब्रँडकडून सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर, यासह तुम्हाला बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट EMI यांसारख्या ऑप्शन्सचा देखील लाभ घेता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Moto G85 5G ची किंमत आणि त्यावरील डिस्काउंट-

Also Read: Apple Intelligence सह लाँच झाला नवीन iPad Mini! मिळतील Powerful फीचर्स, जाणून घ्या किंमत

Moto G85 5G ची किंमत आणि ऑफर्स

Moto G85 5G भारतात 8GB RAM + 128GB आणि 12GB RAM + 256GB मॉडेल या दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. लाँचच्या वेळी या फोनची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये होती. सध्या ब्रँडने दोन्ही मॉडेल्सवर 1000 रुपयांची सवलत दिली आहे. त्यानंतर फोन्स अनुक्रमे 16,999 रुपये आणि 18,999 रुपये इतकी झाली आहे. Moto G85 कोबाल्ट ब्लू, ऑलिव्ह ग्रीन, अर्बन ग्रे आणि व्हिवा मॅजेन्टा कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. यासह तुम्हाला नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळेल. तुम्ही 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांमध्ये डिव्हाइस खरेदी करू शकता. त्याबरोबरच, तुम्हाला 10,450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. येथून खरेदी करा

Moto G85 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

moto g85 5g features

Moto G85 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ pOLED 3D कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम सपोर्ट आहे. या फोनमध्ये रॅम बूस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या मदतीने 24GB पर्यंत रॅम वापरता येते. फोटोग्राफीसाठी, मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा उपलब्ध आहे. यात 50MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :