AI फीचर्ससह सुसज्ज Motorola Edge 50 Pro वर मिळतोय बंपर Discount, बघा Best ऑफर

Updated on 17-Jun-2024
HIGHLIGHTS

Moto Edge 50 Pro 5G स्मार्टफोन Flipkart वर ऑफर्ससह उपलब्ध

Moto Edge 50 Pro 5G फोनवर HDFC क्रेडिट कार्डद्वारे अतिरिक्त 2 हजार रुपयांची सूट

Moto Edge 50 Pro 5G फोनमध्ये AI Photo Enhancement Engine फिचर आहे.

Motorola चा लेटेस्ट स्मार्टफोन Moto Edge 50 Pro 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, हा फोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. मात्र, सध्या या फोनवर काही डिस्काउंट ऑफर्स सुरु आहेत. या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर, 12Gb Ram, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि बरेच पॉवरफुल फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात Motorola Edge 50 Pro वरील ऑफर्स-

Also Read: OnePlus Nord CE 4 Lite 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! बघा टीझर आणि सर्व अपेक्षित फीचर्स

Motorola Edge 50 Pro ची किंमत आणि ऑफर्स

Moto Edge 50 Pro Flipkart सेलमधून कमी किमतीत खरेदी करता येईल. या सेल दरम्यान हा Motorola Edge 50 Pro अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. त्याची मूळ किंमत 36,999 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान हा फोन 29,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC क्रेडिट कार्डद्वारे अतिरिक्त 2 हजार रुपयांची सूट मिळेल. ही सवलत नॉन EMI व्यवहारांवर उपलब्ध असेल. Buy From Here

Motorola Edge 50 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto Edge 50 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा 1.5K poOLED डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट वापरण्यात आली आहे. तसेच, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह मिळेल. तसेच, फोनमध्ये रॅम बूस्टची सुविधा देखील देण्यात आली आहे.

पॉवरसाठी, हा फोन 4,500mAh बॅटरीसह येतो. यासह, 125W टर्बो पॉवर चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल. तसेच, फोन 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, असा कंपनीचा दावा आहे. यात 10W वायरलेस पॉवर शेअरिंग फीचर देखील आहे.

कॅमेरा

Moto Edge 50 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, जो ऑल-पिक्सेल फोकस आणि OIS सपोर्टसह येतो. त्याबरोबरच, यात 13MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स + मॅक्रो व्हिजन सेन्सर आणि 10MP चा टेलिफोटो कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 50MP सेन्सरसह फ्रंट कॅमेरा मिळेल.

विशेष म्हणजे या फोनमध्ये AI Photo Enhancement Engine फिचर आहे. जे स्वयंचलितपणे म्हणजेच ऑटोमॅटिकली फोटोचे विश्लेषण करून तपशील सुधारते. यामुळे फोटो अधिक क्लियारीटी, कलर बॅलन्स इ. मिळतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :