Limited Time Offer! Lava Agni 2 5G वर मिळतोय प्रचंड Discount, अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही। Tech News
ब्रॅंड्सची सर्वात बेस्ट कर्व डिस्प्लेसह येणारी ऑफर म्हणजे Lava Agni 2 5G
फोन सध्या Amazon वर थेट 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचीबद्ध
OneCard क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 1200 रुपयांपर्यंतची स्वतंत्र सूट
देशी स्मार्टफोन निर्माता ब्रँड Lava ने अलीकडेच भारतीय ग्राहकांसाठी Lava Blaze Curve 5G लाँच केले आहे. ब्रॅंड्सची सर्वात बेस्ट कर्व डिस्प्लेसह येणारी ऑफर म्हणजे Lava Agni 2 5G होय. हा हँडसेट सध्या Amazon वर Lava Brand Days सेलदरम्यान सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. 25,999 रुपये किमतीपासून सुरू झालेला हा हँडसेट सेलदरम्यान फक्त 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Lava Agni 2 5G वर मिळणारे अप्रतिम ऑफर्स-
हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G ची भारतीय लाँच डेट Confirm! जाणून घ्या सर्व तपशील। Tech News
Lava Agni 2 5G वरील ऑफर्स
Lava Agni 2 5G चा 8GB + 256GB व्हेरिएंट सध्या Amazon वर 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचीबद्ध करण्यात आला आहे. मात्र, लक्षात घ्या की येथे सवलतीच्या दरात फक्त ग्लास विरिडियन कलर व्हेरिएंट उपलब्ध आहे. याशिवाय, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला OneCard क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 1200 रुपयांपर्यंतची स्वतंत्र सूट मिळू शकते. याशिवाय, ग्राहक इतर ऑफर देखील पाहू शकतात.
एवढेच नाही तर, तुम्ही या डिव्हाइसवर नो कॉस्ट EMI ऑफर देखील घेऊ शकता. अधिक सूट मिळविण्यासाठी, तुम्ही बँक एक्सचेंज ऑफरद्वारे 16,150 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Lava Agni 2 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava Agni 2 5G मध्ये 6.78-इंच लांबीचा FHD+ 120Hz कर्व AMOLED स्क्रीन आहे, जी 950 nits पीक ब्राइटनेस देते. या डिवाइसमध्ये डायमेंसिटी 7050 चिपसेट देण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनी Android 15 पर्यंत निश्चित अपडेट्सचे वचन देते.
फोटोग्राफीसाठी, या हँडसेटमध्ये 50MP + 8MP + 2MP + 2MP रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी यात 4700mAh बॅटरी आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.तर फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या हँडसेटमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2 आणि चार्जिंगसाठी USB टाइप-C पोर्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile