देशी कंपनी Lava चा Lava Blaze X 5G स्मार्टफोन भारतामध्ये काही वेळापूर्वीच लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन आता विशेष ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Lava Blaze X 5G मध्ये परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट फीचर्स मिळतील. अशा परिस्थितीत, Lava Blaze X 5G बजेट वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे या किंमतीत येणारा हा 3D कर्व्ड डिस्प्ले असलेला पहिला फोन आहे.
Also Read: OPPO K12x 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! पहा आगामी फोनची पहिली झलक, फीचर्सदेखील उघड
Lava Blaze X 5G तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 14,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर, फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 15,999 रुपयांमध्ये मिळेल. याव्यतिरिक्त, Lava Blaze X 5G च्या टॉप व्हेरिएंटची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 16,999 रुपये इतकी आहे. हा फोन स्टारलाईट पर्पल आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर म्हणून हा फोन 1000 रुपयांच्या सर्व बँक डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की सर्व प्रकारांची किंमत 1000 रुपयांनी कमी झाली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Lava च्या अधिकृत साईट आणि Amazon वर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Lava Blaze X 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 Octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन वर सांगितल्याप्रमाणे तीन स्टोरेज ऑप्शन्ससह सादर केला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये सोनी सेन्सर मिळेल. या फोनमध्ये 2MP सेकंडरी कॅमेरा देखील आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.