देशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने या यावर्षी मार्च महिन्यात आपला Lava Blaze Curve 5G स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांच्या भरपूर पसंतीस पडला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन सध्या भारी ऑफर्ससह Amazon वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. Lava Blaze Curve 5G वर भारी बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत. जर तुम्हाला एक पॉवरफुल 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर Lava Blaze Curve 5G हा बजेटमध्ये एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊयात Lava Blaze Curve 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: Realme Pad 2 Lite च्या भारतीय लाँच डेटची पुष्टी! परवडणाऱ्या किमतीत लवकरच होणार लाँच, पहा डिटेल्स
Lava Blaze Curve 5G भारतात दोन व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सवर 1,000 रुपयांची सूट असेल. आता तुम्हाला डिव्हाइसचे 8GB रॅम + 128GB मॉडेल फक्त 16,999 रुपयांमध्ये मिळेल. तर, टॉप व्हेरिएंट 8GB RAM + 256GB ची किंमत 17,999 रुपये झाली आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसवर 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. एवढेच नाही तर, बँक ऑफरसह तुम्हाला 16,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. त्याबरोबरच, नो कॉस्ट EMI पर्याय देखील मिळणार आहे.
Lava Blaze Curve 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED 3D कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आली आहे. ही चिपसेट उत्तम परफॉर्मन्स देते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB RAM + 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजमध्ये येते. यासोबत 8GB व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी, Lava Blaze Curve 5G मध्ये EIS आणि 20X ऑप्टिकल झूमसह 64MP प्राथमिक कॅमेरा, 8MP वाइड-एंगल कॅमेरा आणि मागील पॅनलवर 2MP मॅक्रो कॅमेरा लेन्स असेल. त्याच वेळी, सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि चांगल्या ऑडिओसाठी डॉल्बी ATMOS स्पीकर्स देखील आहेत.