Lava: सर्वात स्वस्त 5G फोनवर मिळतेय भारी सूट, आणखी स्वस्तात खरेदी करा

Lava: सर्वात स्वस्त 5G फोनवर मिळतेय भारी सूट, आणखी स्वस्तात खरेदी करा
HIGHLIGHTS

Lava blaze 5G स्मार्टफोनवर Amazon उत्तम ऑफर्स देत आहे.

Lava blaze 5G बजेट स्मार्टफोन सर्वात स्वस्त 5G फोन

सिटी बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 2,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट

Lava blaze 5G स्मार्टफोन सर्वात स्वस्त 5G फोन म्हणून लाँच करण्यात आला होता. देशी कंपनीच्या या स्वस्त फोनमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स मिळतात. 5G च्या जमान्यात प्रत्येकाला वाटते की आपल्याकडे 5G फोन असावे. दरम्यान, सध्या हा स्वस्त फोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळतेय. कुठे ते बघुयात….

Lava blaze 5G वरील ऑफर्स

Lava blaze 5G स्मार्टफोनवर Amazon उत्तम ऑफर्स देत आहे. Amazon वर हा फोन 10,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. जर तुम्ही EMI ने व्यवहार केला तर तुम्ही दरमहा 526 रुपये देऊन हा फोन खरेदी करू शकता. याशिवाय, सिटी बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 2,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जाईल. HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5% झटपट सूट मिळेल. येथून खरेदी करा

याव्यतिरिक्त, जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्हाला त्यावर 11,200 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर फोनची किंमत आणखी कमी होईल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन 

फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले मिळणार आहे, याचा रीफ्रेश रेट 90 Hz आहे. हा फोन Android 12 वर काम करतो. फोनमध्ये 4GB आणि 6GB पर्यंत रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. हा फोन ऑक्टा-कोर 2.2GHz MediaTek Dimensity 700 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. तसेच, यात साइड फिंगरप्रिंट सेन्सर देखील समाविष्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo