Lava Agni 3: गेल्या महिन्यातच देशी कंपनी Lava ने टेक विश्वात आपली क्षमता दाखवून दिली आहे. कंपनीने विशेष ड्युअल डिस्प्ले स्मार्टफोन Lava Agni 3 भारतात लाँच केला आहे. ड्युअल डिस्प्लेसह येणारा हा स्मार्टफोन फोल्डेबल नव्हे तर सामान्य फोन आहे. सध्या, हा मोबाइल फोन 2,250 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Lava Agni 3 वरील ऑफर्स, फीचर्स आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
Also Read: Best Smartphones under 40000: उत्तम कॅमेरासह येतात ‘हे’ नवीनतम जबरदस्त स्मार्टफोन्स, पहा यादी
Lava Agni 3 चे 128GB मॉडेल 22,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. तर, 256GB वेरिएंट 24,999 रुपये इतकी आहे. प्रसिद्ध शॉपिंग साइट Amazon हे दोन्ही व्हेरिएंट 500 रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, फोन खरेदी करताना तुम्ही HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे EMI केल्यास, तुम्हाला 1,750 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
एवढेच नाही तर, HDFC बँकेचे ग्राहक लावा अग्नी 3 फोन 1750 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकतात. या सवलतीनंतर, फोनचे 128GB मॉडेल 20,749 रुपयांना आणि 256GB मॉडेल 22,749 रुपयांना उपलब्ध असेल. तसेच, BOB कार्डवर 1500 रुपये आणि Axis, IDFC FIRST आणि RBL बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Lava Agni 3 5G फोन 6.78-इंच 1.5K डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही 3D कर्व AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोनच्या बॅक पॅनलवर 1.74-इंच लांबीची सेकंडरी स्क्रीन देण्यात आली आहे. हा 2D AMOLED डिस्प्ले आहे. याचा वापर मागील कॅमेरासह सेल्फी घेणे, कॉल आणि मॅसेजेसना उत्तर देणे, नोटिफिकेशन्स, म्युझिक, अलार्म, टाइमर, स्टॉप वॉच, फिटनेस ट्रॅकरसाठी केला जाऊ शकतो. उत्तम परफॉमरन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300X octa-core प्रोसेसरवर लॉन्च करण्यात आला आहे.
Lava Agni 3 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर, LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP Sony IMX766 OIS सेन्सर आहे जो 8MP अल्ट्रावाइड आणि 8MP टेलिफोटो लेन्ससह एकत्र काम करतो. तर, Lava Agni 3 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट सॅमसंग सेन्सर मिळेल. Lava Agni 3 5G स्मार्टफोन बाजारात 5000 mAh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज करण्यात आला आहे, जी 66W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे.