32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Vivo स्मार्टफोनवर प्रचंड डिस्काउंट, ‘या’ ठिकाणी स्वस्तात उपलब्ध

Updated on 09-Nov-2024
HIGHLIGHTS

भारतात नवीन 5G स्मार्टफोन Vivo Y300 Plus लाँच केला होता.

कंपनीने मिड-बजेट म्हणेजच 23,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला.

सध्या Vivo Y300 Plus फोन शॉपिंग साइट Amazon वर ऑफरसह व्रिकीसाठी उपलब्ध आहे.

Vivo ने अलीकडेच गेल्या महिन्यात भारतात नवीन 5G स्मार्टफोन Vivo Y300 Plus लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने मिड-बजेट म्हणेजच 23,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 32MP सेल्फी, 50MP बॅक कॅमेरा आणि 3D कर्व स्क्रीन उपलब्ध आहे. सध्या Vivo Y300 Plus फोन शॉपिंग साइट Amazon वर ऑफरसह व्रिकीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo Y300 Plus स्मार्टफोनची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-

Vivo Y300 Plus 5G

Also Read: बहुप्रतीक्षित iQOO 13 ची भारतीय लाँच डेट अखेर कन्फर्म! डिसेंबरच्या सुरुवातीलाच होणार दाखल

Vivo Y300 Plus ची किंमत आणि ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo Y300 Plus भारतात 23,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. Amazon ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे 24 महिन्यांचा EMI केल्यास 1750 रुपयांची सूट मिळेल. तर, HDFC बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी 12 महिने आणि 18 महिन्यांसाठी EMI केल्यास, त्यांना 1500 रुपयांची त्वरित सूट दिली जाईल.

त्याबरोबरच, 6 आणि 9 महिन्यांच्या EMI पेमेंटवर 1250 रुपयांची सूट मिळेल, ज्यासाठी फक्त HDFC बँक कार्ड वापरावे लागेल. याव्यतिरिक्त, येस बँक क्रेडिट कार्ड EMI आणि PNB क्रेडिट कार्ड नॉन EMI व्यवहारांवर ग्राहकांना 1000 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा

Vivo Y300 Plus चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y300 Plus स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD+ पंच-होल डिस्प्ले आहे. ही 3D कर्व AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे. हा Android आधारित स्मार्टफोन आहे जो Qualcomm च्या Snapdragon 695 octa-core वर कार्य करतो. फोनमध्ये 8GB फिजिकल रॅमसह 16GB RAM पॉवर मिळेल. फोनमध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

Vivo Y300 Plus 5G

फोटोग्राफीसाठी Vivo Y300 Plus फोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP पोर्ट्रेट सेन्सर प्रदान केला आहे. त्यासोबतच, मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2MP लेन्स उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP सेन्सर आहे. हा फोन 5000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 44W फ्लॅश चार्ज तंत्रज्ञान देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :