Price Drop! लेटेस्ट Vivo V40 Pro स्मार्टफोनच्या किमतीत कपात, ‘या’ ठिकाणी मिळतोय भारी Discount

Updated on 11-Nov-2024
HIGHLIGHTS

Vivo V40 Pro फोन भारतीय बाजारात अलीकडेच लाँच करण्यात आला.

आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Vivo V40 Pro मध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे.

Flipkart वर Big Bachat Days सेल 13 नोव्हेंबरपर्यंत लाईव्ह

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आपला Vivo V40 Pro फोन भारतीय बाजारात अलीकडेच सादर केला होता. हा फोन कंपनीने महागड्या किंमत श्रेणीत म्हणजेच 50,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला आहे. मात्र, हा फोन सध्या Flipkart वर सवलती आणि ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी आहे. कारण, Flipkart वर Big Bachat Days सेल 13 नोव्हेंबरपर्यंत सुरु आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन्सवर ऑफर्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव सुरु आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Flipkart सेलदरम्यान Vivo V40 Pro फोनवरील ऑफर्स-

Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Vivo स्मार्टफोनवर प्रचंड डिस्काउंट, ‘या’ ठिकाणी स्वस्तात उपलब्ध

Vivo V40 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo V40 Pro 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. मात्र, आता ते फ्लिपकार्ट सेलद्वारे मोठ्या सवलतीसह सूचिबद्ध करण्यात आले आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोणत्याही बँक कार्डद्वारे Vivo V40 Pro 5G फोनचे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची झटपट सूट मिळणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही हा फोन केवळ 46,999 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल.

तसेच, Vivo V40 Pro 5G फोनवर सेलदरम्यान EMI ऑफर्स देखील देण्यात आले आहेत. याद्वारे तुम्ही हा महागडा फोन सहज खरेदी करू शकता. EMI द्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला दरमहा 8,334 रुपये द्यावे लागतील. तसेच, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी असेल तर, यावर एक्सचेंज ऑफर्सदेखील देण्यात आले आहेत. तुम्हला 31,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Vivo V40 Pro 5G चे तपशील

Vivo V40 Pro 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2800 x 1260 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Mediatek Dimensity 9200+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP सेकंडरी आणि 50MP तिसरा कॅमेरा समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगच्या समर्थनसह येते. हा फोन ब्लॅक आणि ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :