बजेट स्मार्टफोन Itel S23+ वर मोठा प्रमाणात Discount, Amazon वर फोन स्वस्तात उपलब्ध। Tech News 

बजेट स्मार्टफोन Itel S23+ वर मोठा प्रमाणात Discount, Amazon वर फोन स्वस्तात उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Itel S23+ बजेट स्मार्टफोन काही काळापूर्वी भारतात लाँच झाला.

लाँचच्या वेळी Itel S23+ ची किंमत 13,999 रुपये होती.

SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10% झटपट सूट दिली जाईल.

Itel S23+ हा एक बजेट स्मार्टफोन आहे, जो काही काळापूर्वी भारतात लाँच झाला होता. जे बजेट स्मार्टफोनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा लेख उपयुक्त ठरणार आहे. हा फोन बजेट किमतीत सादर करण्यात आला असेल तरी, हा फोन आता Amazon Great Indian Festival Sale मध्ये आणखी स्वस्तात उपलब्ध करून दिला गेला आहे. तुम्हाला सणासुदीच्या काळात नवीन फोन घ्यायचा असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याला भेट द्यायचा असेल, तर ऑफरसह हा फोन अगदी परवडण्याऱ्या किमतीत मिळेल.

Itel S23+ ची किंमत

Itel S23+ बजेट स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. होय, या फोनमध्ये केवळ 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये हे एकच व्हेरिएंट उपलब्ध करून देण्यात आले आहे. लाँचच्या वेळी त्याची किंमत 13,999 रुपये होती, पण आता हा फोन ऑफर्ससह केवळ 12,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकतो.

itel s23+

Itel S23+ वरील ऑफर्स

बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10% झटपट सूट दिली जाईल. यासह तुम्हाला जास्तीत जास्त 1,000 रुपयांची सूट मिळेल. यानंतर फोनची किंमत केवळ 12,999 रुपये होईल. तसेच, EMI ऑफरसह दरमहा केवळ 679 रुपये द्यावे लागतील. हा फोन एलिमेंटल ब्लू आणि लेक क्यान कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. Buy From Here

Itel S23+

या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात डायनॅमिक बारसह GPT AI असिस्टंट आहे. हा फोन Unisoc T616 प्रोसेसरने सुसज्ज आहे. वर सांगितल्याप्रमाणे, यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याचा, पहिला सेन्सर 50MP, दुसरा AI सेन्सर मिळणार आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 32 MP चा फ्रंट कॅमरा उत्तम सेल्फीसाठी मिळणार आहे. पॉवर देण्यासाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo