प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने आपला लोकप्रिय स्मार्टफोन iQOO Neo9 Pro 5G या वर्षी फेब्रूवारी महिन्यात लाँच केला होता. हा फोन कंपनीने मिड बजेटमध्ये सादर केला होता. त्यानंतर, आता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon ने हा iQOO स्मार्टफोन भारी ऑफर्ससह सादर केला आहे. होय, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला iQOO Neo9 Pro 5G वरील भारी ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. फोनमधील विशेष स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO Neo9 Pro 5G मध्ये 120W जलद चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5160mAh बॅटरी मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात iQOO Neo9 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Smartphones Launch in November 2024: जबरदस्त स्मार्टफोन्स बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, पहा यादी
iQOO Neo9 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते. तर, फोनचा दुसरा प्रकार 36,999 रुपयांना येतो. अखेर स्मार्टफोनच्या तिसऱ्या वेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर फक्त HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. तसेच, हा फोन एक्सचेंज ऑफरसह देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Conqueror Black आणि Fiery Red या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. येथून खरेदी करा
iQOO Neo9 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 144Hz इतका आहे. विशेष म्हणजे हा फोन SGS Eye Care डिस्प्लेसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंग, iQOO च्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. याशिवाय, हँडसेट सुपरकॉम्प्युटिंग चिप Q1 चिपसह येतो. हे Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज, 256GB स्टोरेज आणि टॉप वेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 5160mAh बॅटरी आहे, हा फोन 11 मिनिटांत 50% चार्ज होतो. या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी आहे.
फोटोग्राफीसाठी, iQOO Neo9 Pro 5G मध्ये OIS सपोर्टसह 50MP IMX920 कॅमेरा आणि फोनच्या मागील बाजूस 8MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा प्रदान केला आहे. फोनमध्ये 2X पोर्ट्रेट मोड उपलब्ध आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी नाइट, पोर्ट्रेट, स्लो मोशन, सुपरमून, अल्ट्रा एचडी, डॉक्युमेंट फीचर्स उपलब्ध आहेत.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.