iQOO 5G Smartphones On Sale: प्रसिद्ध कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा यादी। Tech News
Amazon वर सध्या iQOO Quest Days सेल सुरू आहे.
सेल दरम्यान निवडक बँकांच्या कार्डद्वारे मोठी बचत करता येईल.
फोनवर एक्सचेंज ऑफर्स आणि नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे.
प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon वर सध्या iQOO Quest Days सेल सुरू आहे. या सेलमध्ये प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँकांच्या कार्डद्वारे मोठी बचत करता येईल. याशिवाय, एक्सचेंज ऑफरसह देखील फोन खरेदी करता येणार आहे. त्याबरोबरच, नो कॉस्ट EMI वरही स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता iQOO च्या 5G फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल जाणून घेऊयात-
हे सुद्धा वाचा: MWC 2024: जगातील सर्वात मोठा ‘टेक फेअर’ कधी होणार सुरु? Xiaomi, Nothing सारखे ब्रँड्स सादर करतील नवकल्पना
iQOO Quest Days सेलमध्ये मिळतील ऑफर्स
iQOO 12 5G
iQOO 12 5G स्मार्टफोनची किंमत 52,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन 2,569 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता. या फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्ड्सवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 512GB पर्यंत स्टोरेज आणि 16GB पर्यंत RAM सह येतो. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे. Buy From Here
iQOO Z7 Pro 5G
iQOO Z7 Pro 5G फोनची किंमत 22,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्ही Amazon वरून हा फोन 1,115 रुपयांच्या EMI वर फोन खरेदी करू शकता. HDFC बँकेच्या कार्डांवर 1000 रुपयांची सूट आहे. फोनमध्ये Dimensity 7200 5G प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. फोन 64MP मेन कॅमेरासह येतो. त्याबरोबरच, यात 66W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 4600mAh बॅटरी उपलब्ध आहे. Buy From Here
iQOO Neo 7 Pro 5G
iQOO च्या या 5G फोनची किंमत 30,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन 1,503 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये HDFC बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या सर्व स्मार्टफोन्सवर 27000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. या फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. फोन 120W फ्लॅशचार्ज चार्जिंग सपोर्टसह येतो. यासह फोन 1 ते 50% पर्यंत चार्ज होण्यासाठी केवळ 8 मिनिटे लागतात. Buy From Here
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile