50MP कॅमेरासह येणाऱ्या iQOO 13 5G वर अप्रतिम Discount! खरेदीपूर्वी पहा टॉप 5 फीचर्स

iQOO 13 5G सिरीज Amazon वर अप्रतिम ऑफर्ससह उपलब्ध
iQOO 13 5G फोन फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम कॅमेरा फीचर्ससह येतो.
फोनमध्ये स्नॅपशॉट, नाईट, पोर्ट्रेट, सुपरमून इ. अनेक आकर्षक कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने काही काळापूर्वी आपली नवीन नंबर सिरीज iQOO 13 5G भारतीय बाजारात लाँच केली होती. ही सिरीज कंपनीने जरा महागड्या श्रेणीत म्हणजे 60,000 रुपयांअंतर्गत लाँच केली आहे. सध्या या 5G स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स मिळत आहेत. हा फोन फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम कॅमेरा फीचर्ससह येतो. सध्या Amazon या फोनवर भारी ऑफर्स देत आहे. पहा ऑफर्स-

iQOO 13 5G ची किंमत आणि ऑफर्स
iQOO 13 5G फोनचा बेस व्हेरिएंट 54,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 59,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon वरून खरेदी केल्यावर 1750 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मात्र, ही ऑफर फक्त ICICI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर दिली जात आहे. हा फोन लेजेंड आणि नार्डो ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. येथून खरेदी करा
iQOO 13 5G चे टॉप 5 फीचर्स आणि स्पेक्स
डिस्प्ले
या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. यासह, हा हँडसेट HDR 10+ सपोर्टसह येतो. त्याबरोबरच, या फोनचे पिक्सेल रिझोल्यूशन 3182×1440 इतके आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षिततेसाठी फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे.
प्रोसेसर
iQOO 13 5G स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. हा फोन सुपर कम्प्युटिंग Q2 चिपसेटने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित फनटच OS 15 वर चालतो.
स्टोरेज
iQOO 13 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह येतो. त्याचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. हा फोन रॅम वाढवण्याचा पर्यायासह येतो.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा मुख्य सोनी IMX921, 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP चा 2x टेलिफोटो लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे.
एवढेच नाही तर, या फोनमध्ये स्नॅपशॉट, नाईट, पोर्ट्रेट, व्हिडिओ, हाय रिझोल्यूशन, स्लो मोशन, सुपरमून, अल्ट्रा एचडी डॉक्युमेंट सारखे कॅमेरा फीचर्स देखील समाविष्ट आहेत.
बॅटरी
iQOO 13 5G स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजीसह येते. तसेच, या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile