120W जलद चार्जिंगसह येणारा iQOO प्रिमियम फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा Best ऑफर्स। Tech News 

120W जलद चार्जिंगसह येणारा iQOO प्रिमियम फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा Best ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

iQOO 12 5G हा कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे.

iQOO 12 5G वर Amazon सध्या ऑफर्सचा वर्षाव करत आहे.

OneCard क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 2250 रुपयांची सूट

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने मागील वर्षी शेवटी iQOO 12 5G एक प्रीमियम स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये चांगल्या डिस्प्लेपासून पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरापर्यंत अनेक भारी फीचर्स उपलब्ध आहेत. सध्या हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची अप्रतिम संधी चालून आली आहे. जर तुम्ही देखील हा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर iQOO 12 5G वर सध्या उत्तम ऑफर्सचा वर्षाव होतोय. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Tips: नवीन Smartwatch खरेदी करायची आहे? या ‘5’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की चेक करा, बघा डिटेल्स। Tech News

IQOO 12 5G किंमत आणि ऑफर्स

IQOO 12 5G स्मार्टफोन Amazon वर 52,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, OneCard क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 2250 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनवर 2,569 रुपयांची EMI पर्याय मिळणार आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला 44,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. मात्र, संपूर्ण व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. येथून खरेदी करा

iQOO 12 5g Camera

IQOO 12 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

IQOO 12 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 144Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी IQOO 12 5G फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

एवढेच नाही तर, फोटोग्राफीसाठी कंपनीने IQOO 12 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यासह तुम्हाला 50MP मेन, 50MP अल्ट्रा वाइड आणि 64MP इतर लेन्स मिळणार आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह येते. ही बॅटरी वेब सर्फिंग सारख्या मूलभूत कार्यांसह संपूर्ण फोन दिवसांपर्यंत चालण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo