प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने मंगळवारी म्हणजेच काल आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन iQOO 13 भारतीय बाजारात लाँच केला आहे. मात्र, हा स्मार्टफोन लाँच होताच कंपनीने जुने मॉडेल iQOO 12 5G मोठ्या सवलतींसह विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. ही सवलत तुम्हाला प्रसिद्ध आणि लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Amazon India वर मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, iQOO 12 फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊयात iQOO 12 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: अखेर पॉवरफुल आणि बहुप्रतिक्षीत गेमिंग फोन iQOO 13 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO 12 5G फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 52,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे. बँक कार्डद्वारे या फोनवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन रु. 2,569 च्या प्रारंभिक EMI सह घरी देखील आणू शकता. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
iQOO 12 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 144Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी यामध्ये Adreno 750 देण्यात आला आहे. तसेच त्यात सुपरकॉम्प्युटिंग चिप Q1 देण्यात आली आहे. तसेच, फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी iQOO 12 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, हे 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 100X डिजिटल झूमसह 64MP टेलिफोटो सेन्सरसह येते. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनला पाण्याच्या संरक्षणासाठी IP64 रेटिंग मिळाले आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO 12 5G फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यासोबत तुम्हाला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. ही बॅटरी वेब सर्फिंग आणि इतर मूलभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.