Best Offer: 50MP कॅमेरासह येणाऱ्या iQOO 11 5G वर बंपर डिस्काउंट, TWS देखील मिळतील Free

Updated on 14-Feb-2024
HIGHLIGHTS

iQOO 11 5G स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध आहेत.

हा स्मार्टफोन खरेदी करून तुम्हाला Vivo TWS Air मोफत मिळत आहेत.

या स्मार्टफोनवर तुम्हाला EMI आणि एक्सचेंज ऑफर्स देखील मिळतील.

Amazon वर iQOO 11 5G स्मार्टफोनवर अनेक अप्रतिम ऑफर्स देत आहे. iQOO ने अलीकडेच आपली लेटेस्ट सिरीज iQOO 12 सिरीज लाँच केली आहे. त्यानंतर, कंपनी जुन्या नंबर सिरीजवर अनेक अप्रतिम ऑफर्स जारी करत आहे. होय, यावेळी या स्मार्टफोनवर बंपर सवलती तर मिळतीलच पण त्यासह इयरबड्स देखील मोफत मिळणार आहेत. जाणून घेऊयात संपूर्ण ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Nothing Phone (2a) Launch Date: बहुप्रतीक्षित स्मार्टफोन ‘या’ दिवशी ग्लोबली होणार लाँच, मिळतील भारी फीचर्स

iQOO 11 5G किंमत आणि ऑफर्स

हा स्मार्टफोन Amazon वर 42,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचिबद्ध आहे. तर, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करून तुम्हाला Vivo TWS Air मोफत मिळत आहेत. त्याबरोबरच, तुम्ही हा फोन 2,181 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. यावर 11,200 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. हा स्मार्टफोन अल्फा आणि लीजेंड या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. येथून खरेदी करा

iQOO 11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या iQOO 11 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा E6 AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. iQOO 11 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB इंटर्नल स्टोरेज आहे. तर, शीर्ष वेरिएंट 16GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 13MP टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी फोनमध्ये स्पोर्ट्स, नाईट, पोर्ट्रेट, स्लो मोशन, सुपरमून सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच, हा 5G स्मार्टफोन 120W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. हा फोन 25 मिनिटांत 100% पूर्ण चार्ज होते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :