iPhone SE 3 केवळ 17,201 रुपयांना खरेदी करा, येथे मिळतेय अप्रतिम ऑफर

Updated on 06-Apr-2023
HIGHLIGHTS

iPhone SE 3 ची खरी किंमत 49,999 रुपये

फ्लिपकार्टवर हा फोन कमी किमतीत सूचिबद्ध

बँक आणि ऑफर्सने देखील फोनची किंमत होणार कमी

सध्या प्रत्येक तरुणाला असे वाटते की, आपल्या खिशात iPhone असावा. एखादा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, सर्वप्रथम आपल्या डोक्यात iPhone च येतो. पण बजेटमध्ये iPhone खरेदीसाठी उपलब्ध असणे, खूप अवघड आहे. पण आता तसे नाही, iPhone SE 3 तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. हा कंपनीकडून येणार किफायती iPhone आहे. सध्या फ्लिपकार्ट iPhone SE 3 वर उत्तम सवलत देत आहे. 

iPhone SE 3 वर डिस्काउंट

iPhone SE 3 ची खरी किंमत 49,999 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवर हा फोन कमी किमतीत सूचिबद्ध करण्यात आला आहे. तुम्ही केवळ 17,201 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता.

फ्लिपकार्ट या फोनवर भारी डिस्काउंट देत आहे. यानंतर या फोनची किंमत 32,699 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. यानंतर काही बँक ऑफर्सदेखील यासोबत आहेत, त्यानंतर किंमत आणखी कमी होईल. 

त्याबरोबरच, iPhone SE 3 एक्सचेंज ऑफर खरेदी करण्यावर 27 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तुम्ही तुमच्या एरियाचा पिन कोड टाकून एक्सचेंज ऑफर चेक करू शकता. मात्र हे लक्षात घ्या की, ही सूट तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. संपूर्ण डिस्काउंट व्हॅल्यू मिळाल्यास केवळ 17,201 रुपयांना तुम्हाला हा फोन खरेदी करता येईल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :