iPhone लव्हर्स! लेटेस्ट iPhone 16 वर तब्बल 7000 रुपयांचा Discount, भारी ऑफर्सचा होतोय वर्षाव

Updated on 15-Nov-2024
HIGHLIGHTS

Apple ने सप्टेंबर महिन्यात आपल्या नवीनतम iPhone 16 सिरीज लाँच केली.

iPhone 16 या बेस मॉडेलवर सध्या मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे.

बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 5000 रुपयांची त्वरित सूट देखील उपलब्ध

सर्वात आघाडीचे टेक जायंट Apple ने अलीकडेच सप्टेंबर महिन्यात आपल्या नवीनतम iPhone 16 सिरीज लाँच केली होती. या सिरीज अंतर्गत येणाऱ्या iPhones मध्ये अनेक नवीन अपग्रेड सादर करण्यात आले. अनेक विशेष फीचर्ससह कंपनीने या सिरीजमध्ये चार मॉडेल्स लाँच केले. त्यापैकी एक म्हणजेच या सिरीजमधील iPhone 16 या बेस मॉडेलवर सध्या मोठ्या प्रमाणात सूट आणि भारी ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. ही सवलत तुम्हाला प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात iPhone 16 वरील ऑफर्स-

Also Read: आगामी OnePlus 13R ची भारतीय लाँच टाइमलाईन Leak! जाणून घ्या काय मिळेल विशेष?

iPhone 16 वरील ऑफर्स

iPhone 16 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. मात्र, आत्ता तुम्ही हे मॉडेल Amazon सेल दरम्यान मोठ्या सवलतीसह खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 16 फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता 2000 रुपयांच्या सवलतीसह केवळ 77,900 रुपयांना खरेदी करता येईल.

एवढेच नाही तर, बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास 5000 रुपयांची त्वरित सूट देखील उपलब्ध आहे. ही सूट 512GB पर्यंतच्या मॉडेल्सवर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, तुम्हाला हा फोन EMI ऑप्शनसह देखील खरेदी करता येईल. EMI साठी सुरुवातीची किंमत 3,777 रुपये दरमहा इतकी आहे. तसेच फोनवर एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी येथे क्लिक करा.

iPhone 16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 16 मध्ये 6.1 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2556 x 1179 पिक्सेल आहे. तसेच, या फोनच्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 1000 nits ची कमाल ब्राइटनेस मिळेल. हा स्मार्टफोन उत्तम परफॉर्मन्ससाठी फोन A18 चिपसेटने सुसज्ज आहे. तसेच, तो iOS 18 सह येतो. iPhone 16 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, 12MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :