iPhone लव्हर्स! लोकप्रिय iPhone 15 वर मिळतोय मोठ्या प्रमाणात Discount, हजारो रुपयांची होईल बचत
iPhone 15 फोनवर तुम्हाला 4000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध
Apple चा iPhone 15 फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंट Amazon वर सवलतीसह उपलब्ध
विशेष म्हणजे या फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर मिळेल.
जगप्रसिद्ध टेक जायंट Apple चे प्रोडक्ट्स फक्त अख्ख्या जगात लोकप्रिय आहेत. भारतातील युजर्सना तर Apple iPhones चे भलतेच क्रेझ आहे. पण हे फोन्स महागडे असल्यामुळे प्रत्येकाला iPhone खरेदी करणे शक्य नसते. मात्र, आता iPhone लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला iPhone 15 खरेदी करायचा असेल तर, या फोनवर सध्या 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iPhone 15 वरील ऑफर्स-
iPhone 15 ची किंमत आणि ऑफर्स
Apple चा iPhone 15 फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंट Amazon वर 79,600 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. सध्या, तुम्ही हा फोन 18% सवलतीसह केवळ 64,900 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम आहात. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक कार्ड डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 4000 रुपयांची वेगळी सूट मिळेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला हा फोन फक्त 60,900 रुपयांमध्ये फोन खरेदी करता येईल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
iPhone 15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iPhone 15 मध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर मिळेल. तर, डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या डिस्प्लेवर हा एक कटआउट आहे, ज्याद्वारे तुम्ही फोनचे विविध नोटिफिकेशन, म्युझिक, बॅटरी परसेंट इ. पाहू शकता. लक्षात घ्या की, आधी हे फीचर फक्त प्रो मॉडेल्स मध्ये उपलब्ध होते, पण हे फीचर बेसिक iPhone 15 मध्ये देखील देण्यात आले आहे.
उत्तम परफॉर्मन्ससाठी, iPhone 15 मध्ये A16 बायोनिक चिप आहे. ही चिप अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही चिप फोटोग्राफीमध्ये 24MP फोटो आणि नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेटला समर्थन देते. यात कॉल दरम्यान व्हॉईस आयसोलेशन फीचर देखील आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपचा प्राथमिक कॅमेरा 48MP आणि 12MP सेकंडरी कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे. iPhone 15 फोन चार्जिंगसाठी USB-C सह येतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile