Flipkart सेलमध्ये लोकप्रिय iPhone 14 वर हजारो रुपयांची सूट, ‘ही’ ऑफर पुन्हा मिळणार नाही

Updated on 12-Nov-2024
HIGHLIGHTS

Apple ने अलीकडेच सप्टेंबर महिन्यात आपली लेटेस्ट iPhone 16 सिरीज लाँच केली.

लेटेस्ट सिरीज लाँच झाल्यानंतर जुने स्मार्टफोन मॉडेल स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध

iPhone 14 वर फ्लिपकार्ट सेलदरम्यान प्रचंड डिस्काउंट मिळत आहे.

प्रसिद्ध आणि लोकप्रिय टेक जायंट Apple ने अलीकडेच सप्टेंबर महिन्यात आपली लेटेस्ट iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. लेटेस्ट सिरीज लाँच झाल्यानंतर जुने स्मार्टफोन मॉडेल सध्या स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Flipkart वर बिग बचत डेज सेल सुरु आहे. सेलदरम्यान अनेक महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला iPhone 14 वरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iPhone 14 ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Upcoming Smartphones in India: पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स, पहा यादी

iPhone 14 वरील ऑफर्स

iPhone 14 फोनच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 69,900 रुपये आहे. मात्र, सध्या ते मोठ्या सवलतीसह खरेदी केले जाऊ शकते. मात्र, iPhone 14 सध्या फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल दरम्यान 8,901 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या डिस्काउंटसह हा फोन 60,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करून देण्यात आला आहे.

एवढेच नाही तर, फोनवर अनेक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5% अमर्यादित कॅशबॅक मिळेल. तसेच, EMI पर्यायद्वारे देखील फोन सहज खरेदी करता येईल. फोनसाठी EMI 2,145/दरमहा रुपयांपासून सुरु होतो. त्याबरोबरच, एक्सचेंज ऑफरद्वारे फोनवर 32,950 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

iPhone 14 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 14 मध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2532 x 1170 पिक्सेल आहे. स्पीड, मल्टीटास्किंग आणि परफॉर्मन्ससाठी हा फोन A15 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. हा मॉडेल iOS 16 सह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 14 फोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्ससह येतो.

iPhone 14 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 12MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा फोन 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी एका चार्जवर 20 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक सपोर्ट प्रदान करते. याव्यतिरिक्त, यात 15W MagSafe वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :