बरेचदा किंमत बघून आपण iPhones खरेदी करणे टाळतो. पण ग्राहकांसाठी या फोन्सवर नेहमीच ऑफर्स येत असतात. आता देखील लोकप्रिय iPhone 13 वर उत्तम डील मिळतेय. खरं तर, जर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वरून iPhone 13 खरेदी केलात, तर तुम्ही निवडक बँक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. तसेच इतरही ऑफर्स उपलब्ध आहेत. बघुयात सविस्तर –
iPhone 13 Flipkart आणि Amazon वर 61,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह सूचीबद्ध आहेत. कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर या फोनची किंमत 69,900 रुपये आहे. म्हणजेच, तुम्हाला दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 7,901 रुपयांची सवलत मिळू शकते. Amazon वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच या ऑफरसह तुम्ही दोन केवळ 59,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही ऑफर Amazon आणि Flipkart या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. Flipkart वरून खरेदीसाठी क्लिक करा
iPhone 13 A15 बायोनिक चिपसेटसह येतो आणि तुम्हाला त्यात लेटेस्ट सॉफ्टवेअर मिळतो. फोन सिंगल चार्ज केल्यानंतर बॅटरी बॅकअप सुमारे 15 तासांसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12MP चा मिळणार आहे. या फोनमध्ये 6.1 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आणि वाईड नॉच उपलब्ध आहे.