iPhone 12 यावेळी खूप स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो.
आपण लेटेस्ट iPhone सिरीजबद्दल बोललो तर तो या नवीनतम फोनपेक्षा iphone 12 तीन जनरेशन जुना आहे.
यात तुम्हाला 12MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
Apple iPhone 12 हा एक चांगला फोन आहे, परंतु तो काही काळापासून जुना झाला आहे. जर आपण लेटेस्ट iPhone सिरीजबद्दल बोललो तर तो या नवीनतम फोनपेक्षा तीन जनरेशन जुना आहे. खरं तर, iPhone 15 वेगवान आहे आणि चांगल्या बॅटरीसह येतो. पण तो खूप महाग आहे. अशात तुम्ही iPhone लवर असाल आणि तुम्हाला कमी किमतीत उत्तम फोन खरेदी करायचा असेल तर, ही बातमी शेवट्पर्यंत वाचा.
दिवाळी 2023 नंतर तुम्हाला नक्कीच एक उत्तम ऑफर मिळणार आहे, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 12 यावेळी खूप स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो.
iPhone 12 वरील ऑफर
सध्या, आयफोन 12 फ्लिपकार्टवरून 39,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा फोनचा 64GB मॉडेल आहे. मात्र, iPhone 12 चे 128GB मॉडेल सुमारे 45,000 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्हाला नवीन फोन खरेदी करताना 35000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज देखील मिळण्याची शक्यता आहे.
iPhone 12
A14 बायोनिक चिपसेट iPhone 12 मध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला iPhone 12 मध्ये खूप चांगला कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला 12MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तुम्हाला फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.1 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळणार आहे. फोनमध्ये 2815mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.