iPhone 14 सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे, परंतु जर तुम्हाला नवीन iPhone खरेदी करण्यासाठी थांबायचे नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय कामाची आहे. खरं तर, नवीन iPhone 14 लाँच होण्यापूर्वी, आताचे iPhone मॉडेल्स मोठ्या ई-कॉमर्स पोर्टल्सवर बंपर सवलतींसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Amazon आणि Flipkart वर iPhone 13, iPhone 12 इतर iPhone मॉडेल्ससह मोठ्या सवलती, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफरसह उपलब्ध आहेत.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Airtel पेक्षा 100 रुपयांनी स्वस्त आहे 'हा' ब्रॉडबँड प्लॅन, मिळेल 40Mbps स्पीड आणि अधिक डेटा
तुम्ही कमी किमतीत एक चांगला iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे Amazon-Flipkart डील अजिबात चुकवू नका. या लेखात आम्ही तुम्हाला iPhone 13, iPhone 12 वर उपलब्ध असलेल्या डील्सबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत…
iPhone 13 128GB चे सर्व कलर व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 7 % सूटसह 73,909 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्हाला 19,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. ज्यामुळे ही डील तुम्हाला अधिक परवडणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट iPhone 13 वर HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर 4,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक यासारख्या बँकिंग ऑफर देखील मिळत आहेत.
Amazon वर, iPhone 13 128GB स्टारलाइट, ब्लू आणि मिडनाईट कलर व्हेरिएंट पूर्ण 14 टक्के सूटसह फक्त 68,900 रुपये आहे. तर Product Red, Green आणि Pink कलर व्हेरिएंट 70,900 रुपयांना 11 % सवलतीसह उपलब्ध आहेत. Amazon फोनवर 12,750 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. मात्र, Amazon iPhone 13 वर बँकिंग ऑफर देत नाही.
iPhone 12 64GB चे सर्व ब्लॅक, ब्लू, प्रॉडक्ट रेड, ग्रीन, पर्पल, व्हाईट कलर व्हेरियंट flipkart वर पूर्ण 8 % सवलतीसह फक्त 59,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला फोनवर 17,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. iPhone 12 वरील एकमेव बँकिंग ऑफर म्हणजे Flipkart Axis Bank कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
Amazon वर iPhone 12 64GB चे प्रोडक्ट रेड व्हेरिएंट 17 % सवलतीसह फक्त 54,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर ब्लू व्हेरिएंट 15 % डिस्काउंटसह केवळ 55,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ग्रीन, पर्पल, व्हाईट कलर व्हेरिएंट 11 % डिस्काउंटसह केवळ 58,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. Amazon फोनवर 12,750 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. तर, Amazon HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 1000 रुपयांच्या किमान खरेदी किमतीसह 250 रुपयांपर्यंत 5 टक्के झटपट सूट देखील देत आहे.